27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीय'कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी...', चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर पलटवार

‘कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी…’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर पलटवार

राज्याततील राजकारणात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर अधिक चर्चा पाहायला मिळत आहेत. या प्रकरणावरून राजकीय नेते एकमेकांविरोधात हमरातुमरीवर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत सर्वांची तोंडं बंद केली जाणार असे वक्तव्य केले होते. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यावर नार्को टेस्ट करा, तोंडंबंद करणार म्हणजे काय करणार? मलिक, राऊत, देशमुखांना अडकवलत तसं अडकवणार आहात? मारणार आहात? हि धमकी आहे का? असा सवाल केला होता. यानंतर (२० ऑक्टोबर) नाशिक येथे शिवसेना ठाकरे गटाने ड्रग्ज प्रकरणाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्च्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. यावर आता भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी कुत्ता गोळी घेतली असावी असा राऊतांवर पलटवार केला आहे.

नाशिक येथे आज अंमली पदार्थ सेवन प्रकरणाबाबत मोर्चा घेण्यात आला होता. या मोर्च्यात शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी पक्षांवर सडकून टिका केली होती. नाशिक सारख्या शहरात ड्रग्स रॅकेट सुरु असून १५ लाखांचे हाफ्ते कुणाला जातात हे मला माहित आहे. तर त्या मोर्चात राऊतांनी सरकारने कुत्ता गोळी खाल्ली का? पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली का? या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करा, अशी टीका संजय राऊतांनी भाजप सरकारवर केली आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

हेही वाचा

‘यांना बुडवण्याची नाही, तुडवण्याची वेळ आलीय’ राऊतांचा सरकारला इशारा

मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही – मनोज जरांगे-पाटील

रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

काय म्हणाल्या चित्रा वाघ

दररोज सकाळी पिसाळल्यागत भुंकणा-यांना पाहिल्यानंतर जनतेला कळालंच असेल की कुत्ता गोलीची नशा कोण करतंय ते … सर्वज्ञानी संजय राऊत. दररोज सकाळी तोंड उघडल्यानंतर जे काही बरळतात… त्यावरून कळतं की त्यांची कुत्ता गोळीची नशा कधी उतरतच नाही. कुत्ता गोलीच्या नशेत असल्यामुळेच सर्वज्ञानी संजय राऊतांच्या तोंडून महिलावाचक शिवीगाळ येते.. बाळासाहेबांच्या विचारांना सोडून औरंगजेबाच्या थडग्यावर मस्तक टेकवणारे कुत्ता गोळीच्या नशेतच असावेत.

कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी कुत्ता गोळी घेतली

हिंदुत्वाचा विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणा-यांनी कुत्ता गोळी घेतली असावी. कोविड घोटाळ्यातील भ्रष्टाचार, पत्राचाळीतील भ्रष्टाचार हे गुन्हे कुत्ता गोळीची नशा करूनच केले असावेत… उद्धव ठाकरेंच्या आसपास असे कुत्ता गोळी खाणारे नशेबाज असल्यामुळेच त्यांचा पक्ष उद्ध्वस्त झाला. कुत्ता गोळीची ही नशा डोक्यात इतकी भिनलीय की, आता भ्रमिष्ट झालेल्या संजय राऊतांना महायुती सरकार करत असलेला महाराष्ट्राचा विकासही दिसेनासा झाला आहे… २०२४ च्या निवडणुकांनंतर यांची ही कुत्ता गोळीची भयानक नशा नक्की उतरेल… असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी