26 C
Mumbai
Thursday, November 16, 2023
घरराजकीयभुजबळांचा शरद पवारांवर पलटवार, नाशिकमधील होर्डिंग्जवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो

भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार, नाशिकमधील होर्डिंग्जवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार होर्डिंगबाजी केली आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवरून आता अपेक्षप्रमाणे शरद पवार गायब झाले आहेत. पण शरद पवारांच्या जागी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून बॅनर आणि होर्डिंग्जवर शरद पवारांचा फोटो आवर्जून वापरला जायचा. याला पवारांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर आता शरद पवारांच्या जागी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि पवार ज्यांचा आदराने गुरू असा उल्लेख करतात त्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरण्यात आला आहे. एकप्रकारे पवारांच्या जागी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरून भुजबळांनी थोरल्या पवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

अजित पवारांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही अजित पवार गटाचे सर्व आमदार आणि नेते यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. एवढेच नव्हे तर पवाराच आमचे आदर्श, पवाराच आमचे नेते, असा वारंवार उल्लेख केला होता. पण पवारांनी त्यांचे फोटो अजित पवार गटाला वापरण्यास मनाई केली. त्यानंतरही पवारांचे फोटो बॅनरवर वापरणे सुरूच होते. अखेर शरद पवारांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो बॅनर, होर्डिंग्जवर वापरणे बंद करण्यात आले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार येणार म्हणून छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी केली आणि सर्व बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरण्यात आले नव्हते. पण शरद पवार यांच्या जागी आधुनिाक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यात आला. यावर आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण मेख अशी आहे की, यशवंतराव चव्हाणांना शरद पवार गुरुस्थानी मानतात, त्यांचा राजकीय आदर्श ते बाळगतात. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर शरद पवारांनी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरू केला होता.

हे ही वाचा

अजितदादांच्या ‘टोपी’ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची चर्चा पोहचली दिल्लीत

मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी विधानभवनात भेदभाव !

या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार ज्यांचा उठता-बसता उल्लेख करतात त्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरून शरद पवारांनावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी