भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने शिवाजी रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पुतळयाचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. महाड येथील क्रांतीचे ठिकाण असलेल्या चवदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून आव्हाड यांनी करोडो अनुयायी यांच्या भावना दुखावल्या आहेत.(BJP burns Jitendra Awhad’s effigy)
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष पद भुषवलेला नेता, विधानसभेचा सलग तीन वेळेला सदस्य असलेला नेता, महाराष्ट्र राज्याचा माजी मंत्री असलेला नेता केवळ प्रसिध्दीच्या हव्यासा पोटी आंदोलन करतांना इतक बेजवाबदार कसे वागू शकतो असा सवाल भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केला. महापुरुषांच्या बाबत सामान्य कार्यकर्ता देखील अतिशय सतर्क राहून काळजी घेतो. पण आव्हाड सारख्या नेत्याला समजले नाही का ? असे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पार्टीने या घटनेचा अतिषय तीव्र निषेध केला असून शिवाजी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पांजली अर्पण करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.
आंदोलना प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव,आ.ॲड.राहूल ढिकले, ज्येष्ठ नेते विजय साने, गिरीष पालवे, सुनिल केदार, रोहीणी नायडू, गणेश कांबळे, अमित घुगे, प्रदिप पेशकार, राकेश दोंदे, वसंत उशीर, देवदत्त जोशी, अविनाश पाटील,रविंद्र पाटील, स्वाती भामरे, भगवान दोंदे, अमोल गांगुर्डे, कविता तेजाळे, कुंदन खरे, गजानन रणबावळे, चंद्रकांत खोडे, करुणा गायकवाड, सुजाता करजगीकर, शोभा जाधव, स्मिता जोशी, सुनिल लोणारी, पवन उगले, प्रदिप पाटील, राम बडोदे, सचिन मोरे, प्रतिक शुक्ल, ललित नहार, आरिफ काझी, आदित्य दोंदे, शंतनु शिंदे, उत्तम उगले, शिवम शिंपी, हेमंत आगळे, ऋषिकेश आहेर, जान्हवी बिरारी, बापु डापसे, मिहिर हजारे, गणेश आवनकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.