30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराजकीयAam Aadmi Party : आता 'आम आदमी पार्टी'च्या 40 आमदारांवर भाजपची वाईट...

Aam Aadmi Party : आता ‘आम आदमी पार्टी’च्या 40 आमदारांवर भाजपची वाईट नजर, प्रत्येकी 20 कोटींची ऑफर

भाजप 800 ‍कोटी रुपये खर्च करुन दिल्लीचे सरकार पाडण्याच्या तयारीमध्ये आहे. आपचे आमदार फोडण्यासाठी भाजपने 20 कोटींची ऑफर दिली आहे. जर एकाने दुसऱ्या आमदाराला आणले तर 25 कोटी देणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक राज्यातील इतर पक्षांचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीमध्ये 9 आमदार उपस्थित‍ नव्हते. त्यामध्ये मनिष सिसोदीया देखील नव्हते ते हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर अरविंद केजरीवाल राजघाटावर पोहोचले त्यांनी महात्मा गांधीना श्रद्धांजली वाहिली. अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप आमचे 40 आमदार फोडण्याच्या तयारीमध्ये आहेत. प्रत्येक आमदाराला 20 कोटींची ऑफर दिली आहे.

भाजप 800 काेटी रुपये खर्च करुन दिल्लीचे सरकार पाडण्याच्या तयारीमध्ये आहे. दिल्लीच्या आमआदमी पार्टीच्या सरकारकडे 62 जागा आहेत. तर भाजपकडे केवळ 8 जागा आहेत. दिल्लीचे आम आदमी पार्टीचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, आपच्या सरकारला धोका नाही. आजच्या बैठकीला गैरहजर असलेले आमदार त्यांच्या वैयक्तीक कामासाठी बाहेर गेले आहेत. सरकार स्थिर आहे. मात्र 12 आमदारांना पक्ष सोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : लवकरच‍ तुमच्या खात्यामधून ‘टोल’ ची रक्कम वसूल होणार – नितीन गडकरी

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

Internet :ऑक्टोबरमध्ये ‘5 जी’ इंटरनेट सेवा सुरु होऊ शकते

भाजप आमच्या 40 आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे नेता संजय सिंह यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. आपचे आमदार फोडण्यासाठी भाजपने 20 कोटींची ऑफर दिली आहे. जर एकाने दुसऱ्या आमदाराला आणणले तर 25 कोटी देणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपचे ऑफर मिळालेले चार आमदार कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हजर होते.

संजय सिंह यांनी सांगितले की, संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराचा यामध्ये समावेश आहे. या चार आमदारांना 40 कोटींची ऑफर देण्याचा भाजपने प्रयत्न केला. आपच्या 20 आमदारांवर भाजपची वाकडी नजर आहे. तर मन‍िष स‍िसोदीया यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी आम आदमी पार्टी षडयंत्र रचत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी