28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयभाजप नेत्यानेच 'मोदीभक्तां'ची केली चंपी

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

टीम लय भारी

मुंबई : सोशल मीडियावर भाजपचे समर्थक अर्थात मोदी भक्त आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते असे वादविवाद नेहमीच पाहायला मिळत असतात. त्यामुळे भाजप पक्ष हा मोदी भक्तांमुळे कायमच ट्रोल होत असतो. कारण मोदींविषयी कोणी काही बोलले की, हे मोदी भक्त त्या व्यक्तीवर तुटून पडतात. त्यामुळे सोशल मीडियावर कोणाचे कार्यकर्ते म्हणा, किंवा समर्थक हे प्रभावीपणे ऍक्टिव्ह असतील तर त्यांच्यात मोदी समर्थकांचा अथवा भाजप समर्थकांचा प्रथम क्रमांक लागतो.

पण या मोदी भक्तांना त्यांच्याच भाजपच्या एका नेत्याने घरचा आहेर दिला आहे. या नेत्याचे नाव आहे सुब्रमण्यम स्वामी. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आता पर्यंत भाजपकडून सहा वेळा खासदार राहिले आहेत. उच्च शिक्षित असलेले सुब्रमण्यम स्वामी हे कायमच वेगवेगळ्या विषयांवर ट्विटरवर आपले मत व्यक्त करत असतात.

सुब्रमण्यम स्वामी यांनी चक्क त्यांच्या ट्विटमधून मोदी भक्तांनाचं अर्धशिक्षित असे म्हंटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘ट्विटरवर असलेल्या मोदी भक्तांची अडचण अशी आहे की ते अर्धसाक्षर आहेत. ते माझ्या पीएच.डी आणि माझ्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारावर ट्विटशी बरोबरी करू शकत नाहीत. एक तर ते गैरवर्तन करू शकतात किंवा ब्लॉक करू शकतात. आणि हि दयनीय परिस्थिती आहे.’

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर त्यांना त्यांच्या पीएच.डी चा गर्व असल्याचे सुद्धा म्हंटले आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांच्या या ट्विटमुळे त्यांना सुद्धा मोदी भक्त ट्रोल करणार का? हे पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :

‘मोडक सागर’ आणि ‘तानसा धरण’ ओव्हरफ्लो

‘ये पब्लिक है ये सब जानती है’, जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

संसदेबाबतच्या बिनबोभाट निर्णयांवरून सुप्रिया सुळे यांनी उपटले केंद्र सरकारचे कान

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!