30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयसंजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यथेच्छ तोंडसुख

संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर भाजप नेत्यांकडून यथेच्छ तोंडसुख

टीम लय भारी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले परंतु दोन्ही वेळेस कारणं सांगून राऊत यांनी जाणे टाळले त्यामुळे ईडीने आपली कारवाई तीव्र करत आज (दि. 31 जुलै) संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर धाड टाकली असून तपासणीस सुरवात केली आहे. दरवेळी शिवसेनेची पाठराखण करणारे शिवसेना नेते राऊत स्वतःच अडचणीत आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणि टिका – टिप्पणींना उधाण आले आहे. भाजप नेते तर सोशल मिडीयावर राऊत यांच्यावर मिश्कील टीका करण्यात व्यस्थ असल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत संजय राऊत यांना ट्वीट करीत टोला लगावला आहे, मोहोळ ट्वीटमध्ये लिहितात, “तोंडाच्या वाफा टाकणारी सकाळची पत्रकार परिषद आज नसणार तर!” असे म्हणून राऊत यांच्या रोजच्या बेताल वक्तव्यावर त्यांनी कडाडून टीका केली आहे.

दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सुद्धा राऊत यांना धारेवर धरत तोंडसुख घेतले आहे. भातखळकर ट्विटमध्ये लिहितात, “करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही…. ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत.” असे म्हणून त्यांनी ‘माझा घोटाळ्याशी काडीमात्र संबध नाही’ असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांचेच ट्विट पोस्टमध्ये अॅड करत म्हटले आहे.

सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह राहणारे आणि कायम शिवसेनेवर टीका करणारे निलेश राणे यांनी सुद्धा गुड मॉर्निंग, संज्याचे बारा वाजले, असे म्हणून राऊत यांनी चिडवले आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी सुद्धा ट्विट करत हिसाब तो देना पडेगा (हिशोब तर द्यावा लागणार) असे म्हणून 1200 करोड पत्राचाळ घोटाळा, वसई नायगाव पीएसीएल प्रोजेक्ट घोटाळा असे सुद्धा त्यात म्हणून त्यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.

दरम्यान या ईडीप्रकरणी संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे ईडी अधिकारी अधिक चौकशीसाठी राऊत यांना ईडी कार्यालयात नेणार का, या प्रकरणी त्यांना अटक होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

राज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

एका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची छत्रपती संभाजी महाराजांची मागणी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!