राजकारणात आरोपप्रत्यारोप हे सतत सुरू असतात. विरोधक सत्ताधाऱ्यांवर तर सत्ताधारी विरोधकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. टीका टिपण्णी हे अस्त्र वापरून दोन्ही बाजूचे नेते आता आगामी निवडणुक लक्षात घेता मतदारांना आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता भाजपचे आमदार डॉ. आशिष शेलार हे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव यांच्यावर बरसले आहेत. गर्व से कहो हम हिंदू है, म्हणणारी शिवसेना आता गर्व से कहो हम समाजवादी है, म्हणू लागली अशी टीका आता भाजपचे आमदार डॉ. आशिष शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार हे नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणासाठी चर्चेत पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाला शेलारांनी ठाकरेच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू, असा इशारा दिला होता. हे वृत्त एबीपी माझाच्या वृत्तवाहीनीने दिले आहे. काही दशकांपासून महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना पोसत असल्याची टीका शेलारांनी केली होती. सांडपाणी प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला. यामुळे आता ठाकरे गटाला मुंबईतून तडीपार करा, असे शेलार म्हणाले होते.
हेही वाचा
येरवडा भूखंडाचे प्रकरण अजित पवारांना शेकणार? मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप
‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका
महादेव, टोकरे, मल्हार कोळयांच्या जात प्रमाणपत्रासाठी नीलम गोऱ्हे आग्रही
यानंतर आता शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना टार्गट केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यावर ठाकरे फटकारी मारले आहेत. आणि सुपूत्राने समाजवाद्यांसोबत जाऊन दाखवले. गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता.. “गर्व से कहों हम समाजवादी हैं” म्हणू लागली..! ते गर्व से कहो हम एमआयएम है, असे म्हणतील, असे ट्वीट करत शेलारांनी उद्धव ठाकरेंना फटकारले आहे.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?
◆शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!
◆श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले !
◆राम मंदिरावर टीका करुन…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2023
काय होते ट्वीट
हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले. वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं. “गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता.. “गर्व से कहों हम समाजवादी हैं” म्हणू लागली..! भविष्यात कदाचित “गर्व से कहो हम एमआयएम हैं” सुध्दा म्हणू लागतील. अशी शाब्दिक टोलेबाजी ट्वीटच्या माध्यामातून शेलारांना केली आहे.