25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'धनगरी ताकद काय असते दाखवून देऊ' आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर आक्रमक

‘धनगरी ताकद काय असते दाखवून देऊ’ आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर आक्रमक

राज्यात सध्या मराठा मोर्चामुळे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा मोर्चाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे यासाठी मागणी केली होती. सरकारने जरांगे-पाटील यांना आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. मात्र यावर कोणताही तोडगा न काढल्याने जरांगे-पाटील आता सभा घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समावेश व्हावा अशी मागणी केली होती. याच मुद्द्यावरून आता गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याबाबत न्यायालयाने सुनावणी करावी अन्यथा धनगरी ताकद काय असते हे दाखवून देऊ असे बुलढाणा येथील एका सभेत बोलत होते.

धनगर समजाला आदिवासी प्रवर्गात सामील करून घ्या असे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आवाज उठवला आहे. राज्यातील केवळ 10 टक्के आदिवासी आहेत, तेच फक्त धनगर समाजाला सामावून घेण्यासाठी नकार देत आहेत. त्यापैकी अजून 90 टक्के आदिवासी समाजातील लोकांना एसटी प्रवर्गाचे जातप्रमाणपत्र मिळालेले नाही. राज्यात 1 कोटी 5 लाख आदिवासी समाजाची लोकं आहेत. केवळ 10 टक्के म्हणजेच 5 लाख आदिवासी समाजातील लोकांना जातप्रमाणपत्र मिळाले आहे. धनगर आरक्षणासह आम्ही 33 आदिवासी समाजातील जमातींना एसटी सर्टिफिकेट मिळवून देणार त्यासाठी हा लढा लढावा लागणार आहे, असे पडळकर म्हणाले आहेत.

हेही वाचा 

कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!

गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?

मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ

तर धनगर जागर यात्रा 

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यायालयाकडून आरक्षणाबाबत सुनावणी व्हावी. न्यायालयाने धनगर आरक्षणाला मान्यता द्यावी. जर न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले नाही तर प्लॅन बी तयार करावा लागेल. या माध्यमातून धनगर समाजाला जागे करणार आणि जागर यात्रा करणार आहे. धनगरी ताकद काय असते हे दाखवून देणार आहे. त्याचप्रमाणे गोपीचंद यांनी पुढे कंत्राटी भरतीवर भाष्य केले होते. कंत्राटी भरतीबाबत निर्णय काही अंशी महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. आता जरी तसे काही झाले तरीही आरक्षण द्या अशी सरकारला विनंती आहे.

काय आहे एसटी प्रकरण?

धनगर समाज हा अनुसूचित जाती-जमातीत (एसटी) समाविष्ट व्हावा यासाठी धनगर समाज प्रयत्न करता आहे. धनगर समाजाला आरक्षणाबाबतचा निर्णय हा येत्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे. हा मुद्दा काही वर्षांपासून रखडला आहे. परराज्यात अनुसूचित जाती-जमातीचे (एसटी) प्रमाणपत्र दिले. मात्र राज्यातील धनगर समाजाला अजूनही एसटीचे जातप्रमाणपत्र का दिले जात नाही. धनगड आणि धनगर या नावांमुळे हा मुद्दा अजूनही रखडला आहे. याबाबत आता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या धनगर आरक्षणाबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्यातील धनगर समाजातील लोकांचे लक्ष या निकालाकडे असणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी