31 C
Mumbai
Sunday, May 7, 2023
घरराजकीयधक्कादायक : ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक : ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

राज्यातील सत्तासंघर्ष आता अराजकतेकडे जात असल्याचे पाहायला मिळत असून ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोनच दिवसांपूर्वी ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यावरून वातावरण चांगलेच तबल्याचे पाहायला मिळत असतानाच आता भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील महात्मा फुलेनगर भागात भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला आहे. ज्या वेळी हा हल्ला करण्यात आला त्यांवेळी कार्यालयात कोणीही नव्हते, असे बिस्वाल यांनी सांगितले. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP office in Thane attempt to set on fire)

धनंजय बिस्वाल ठाणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. महात्मा फुले भागात त्यांचे एकमजली घर आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर भाजपचे कार्यालय सुरू केले आहे. मंगळवारी होळीच्या दिवशी ते घरी एकटेच असताना पहाटे ५.०० च्या सुमारास अचानक कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. नेमके काय झाले याचा अंदाज घेण्यासाठी ते कार्यालयात गेले. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती कार्यालयात केरोसीन ओतत असल्याचे त्यांना दिसले. बिस्वाल यांना पाहताच त्याने बाहेर पळ काढला. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्याच्य साथिदारासोबत पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी धनंजय बिस्वाल यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

त्यात काय एवढे, सामान्यांच्या घरीही ४-५ कोटी सापडतात, भाजप आमदार विरुपक्षप्पांचे निर्लज्ज विधान

१८० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीच्या म्युझिअमसाठी ५ कोटी रुपये ! ; जे. जे. चा इतिहास जनतेसमोर सादर करणार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी