29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयNitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

Nitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

महाराष्ट्र भाजपवर वर्चस्व असणारे देवेंद्र फडणवीस यांना आता राष्ट्रीय नेतृत्वाकडून सुद्धा पसंती मिळू लागली आहे, तर दुसरीकडे गडकरींचे महत्त्व कमी होत असल्याचे चित्र ठळक होऊ लागले आहे, त्यामुळे भाजपच्या गोटातून नितीन गडकरी यांचा दुजाभाव होतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या पक्षीय संघटनेत आज (बुधवारी) महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. या प्रक्रियेत भाजपने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काही महत्त्वाच्या जुन्या जाणत्या नेत्यांना वगळण्यात धन्यता मानली आहे. संसदीय समिती आणि भाजपच्या पक्षीय सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी देण्यात आली आहे. या नवनियुक्तींनंतर संघटनेत आता महाराष्ट्राचे एकही नेतृत्व उरले नसल्यामुळे केंद्रातील महाराष्ट्रातील नेतृत्व संपवण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जातेय का असा सवालच आता विचारण्यात येत आहे.

भाजपच्या (BJP) संघटनात्मक पातळीवरच्या महत्त्वाच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्या. या मध्ये नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना यावेळी वगळण्यात आले, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. नवनियुक्तीप्रमाणे समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी एल संतोष या अकराच जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्याच नेतृत्वाचा समावेश नाही.

Azadi ka Amrit Mahotsav:’आजादी का अमृत महोत्सव’ : पतंगबाजीमुळे शेकडो पक्षी घायाळ

Youth Initiative : राज्यात निघणार स्टार्टअप, इनोव्हेशन यात्रा, शिंदे सरकारचा उपक्रम

P. L. Deshpande Kala Academy : पु. ल. देशपांडे कला अकादमीला मिळते लाखो रुपयांचे भाडे, तरी आहे सुविधांचा अभाव

मिळालेल्या माहितीनुसार, संसदीय समिती आणि भाजप पक्षाच्या सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांनाा बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय निवडणूक समितीत वर्णी लागली आहे. महाराष्ट्र भाजपवर वर्चस्व असणारे देवेंद्र फडणवीस यांना आता राष्ट्रीय नेतृत्वाकडून सुद्धा पसंती मिळू लागली आहे, तर दुसरीकडे गडकरींचे महत्त्व कमी होत असल्याचे चित्र ठळक होऊ लागले आहे, त्यामुळे भाजपच्या गोटातून नितीन गडकरी यांचा दुजाभाव होतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, समिती निवडीच्यावेळी भाजपमध्ये पंचाहत्तरीचा नियम लावण्यात येतो, परंतु यावेळी येडीयुरप्पा 77 वर्षांचे असून सुद्धा त्यांना समितीत स्थान दिले गेले आणि गडकरी सध्या 65 वर्षांचे असून सुद्धा त्यांना भाजपकडून सरळ डावलण्यात आल्याने मोदी – शहांच्या या राजकीय भूमिकेवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बलाढ्य नेतृत्व असून सुद्धा त्यांनाच उघडपणे काढून टाकणे म्हणजे महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा का सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

भाजपच्या संसदीय मंडळात या नेत्यांची वर्णी

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बी एल संतोष (सचिव)

भाजपची केंद्रीय निवडणूकीत समिती

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया,भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बी.एल.संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास (पदसिद्ध)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी