31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरराजकीयपोटनिवडणुकांमध्ये भाजपची जादू चालली नाही; केवळ दोन जागांवरच विजय

पोटनिवडणुकांमध्ये भाजपची जादू चालली नाही; केवळ दोन जागांवरच विजय

गुरूवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसह राजस्थान, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडीसा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले.

गुरूवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसह राजस्थान, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडीसा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले. गुजरातमध्ये भाजपला अभूतपुर्व यश मिळाले असून भाजपची गेल्या २७ वर्षांची सत्ता कायम राहिली आहे. मात्र हिमाचल प्रदेश विधानसभा तसेच इतर पोटनिवडणुकांमध्ये मात्र भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेशातील रामपुर मतदार संघातील पोट निवडणुक आणि बिहारमधील कुढणी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेद्वार विजयी झाले आहेत. राजस्थान, उत्तरप्रदेशातील मैनपुरी लोकसभा आणि खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेद्वार पराभूत झाले असून छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर ओडीसामधील पदमपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेद्वार पराभूत झाले आहेत.

राजस्थान पोटनिवडणुकीचे निकाल

राजस्थान विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. येथे काँग्रेसचे अनिल शर्मा यांना ९० हजार ९१५ मते मिळाली असून त्यांनी भाजपच्या अशोक पिंचा यांचा २६ हजार ८५२ मतांनी पराभव केला आहे. अशोक पिंचा यांनी ६४ हजार २१९ मते मिळाली आहेत.

 उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये देखील भाजपची जादू चाचली नाही मैनपुरी लोकसभा मतमदार संघातून समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव विजयी झाल्या तर खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजपची हार झाली आहे. खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत देखील सपा-रालोआ-आसपाचे उमेद्वार मदन भैया यांचा विजय झाला आहे.  मदन भैया यांनी भाजपच्या राजकुमारी सैनी यांचा पराभव केला. तर रामपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे  उमेद्वार आकाश सक्सेना यांचा विजय झाला आहे. सक्सेना यांनी समाजवादी पक्षाचे आसिम रजा यांना पराभूत केले आहे.

छत्तीसगड पोटनिवडणुकीचे निकाल

छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसलाच मतदारांनी पसंती दिली. गेल्या चार वर्षांमध्ये एकाही पोटनिवडणुकीत भाजपला येथे विजय मिळवता आलेला नाही. भुपेश बघेल यांच्या रणनीतीपुढे भाजप फेल ठरला. भानुप्रतापुर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेद्वार विजयी ठरला आहे. येथे काँग्रेसच्या उमेद्वार सावित्री मंडावी यांनी भाजपचे उमेद्वार ब्रह्मानंद मेताम यांचा २१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
हे सुद्धा वाचा
हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेसला 40 जागांवर विजय; या उमेद्वाराचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

भारताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात युवकांना विकसित भारत द्यायचा आहे; गुजरात निवडणुकीनंतर मोदींनी युवावर्गाचे मानले आभार

मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लागेल; देवेंद्र फडणवीसांची गुजरातच्या निकालानंतर प्रतिक्रीया

बिहार पोटनिवडणुकीेचे निकाल

बिहारमध्ये कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेद्वार विजयी झाला आहे. जेयुडी आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर अशी निवडणुक झाली शेवटपर्यंत उत्सुकता लागुन राहिलेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेद्वार केदार गुप्ता यांनी जेयुडीचे उमेद्वार मनोज कुशवाह यांचा पराभव केला. मतमोजनीत शेवटच्या राऊंडला भाजपचे उमेद्वार केदार गुप्ता यांनी कुशवाह यांना पिछाडीवर टाकत विजय मिळवला. गुप्ता यांना एकुन ७६६४८ मते मिळाली तर कुशवाह यांना ७३०१६ मते मिळाली. गुप्ता यांनी कुशवाह यांचा अवघ्या ३६३२ मतांनी पराभव केला.

ओडीसा पोटनिवडणुकीचे निकाल

ओडीसामधील बरगढ जिल्ह्यातील पदमपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची हार झाली आहे. सत्तारुढ पक्ष बीजू जनता दलाच्या उमेद्वार वर्षा सिंह बरिहा यांनी भाजपचे उमेद्वार प्रदीप पुरोहीत यांचा ४२ हजार ६७९ मतांनी पराभव केला आहे. वर्षा सिंह बरिहा या दिवंगत विधानसभा सदस्य विजय रंजन सिंह यांच्या कन्या आहेत. विजय रंजन सिंह बरिहा यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणुक झाली. त्यात भाजपच्या उमेद्वाराचा पराभव झाला.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!