28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयजळगावत भाजप-सेनेची युती होणार? राजकीय वातावरणात उडाली खळबळ

जळगावत भाजप-सेनेची युती होणार? राजकीय वातावरणात उडाली खळबळ

टीम लय भारी

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन या तिन्ही बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे(BJP-Sena alliance in Jalgaon? Excitement erupted in politics).

भाजप खासदार रक्षा खडसे यांनी गुलाबराब पाटलांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रक्षा खडसे आणि गुलाबराव पाटलांच्या भेटीनंतर जळगावात भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेची युती होणार का?, या प्रश्नावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अशा युतीबाबत वरिष्ठांचे काही आदेश नसल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. राज्यात महाविकास आघाडी-भाजप संघर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेना-भाजप युतीची परिस्थिती राहणार नाही, असंही रक्षा खडसेंनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा 

एकनाथ खडसे गटाने कशीबशी जिंकली कोथळी ग्रामपंचायत

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Pune land deal: PMLA court rejects bail plea of Girish Chaudhri, son-in-law of NCP leader Eknath Khadse

आगामी निवडणुका कशा लढवायच्या हे वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील, असं सूचक वक्तव्य देखील रक्षा खडसे यांनी केलं आहे. तर गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे वादावर बोलताना महाविकास आघाडी एकत्र असूनही या नेत्यांचा अंतर्गत संघर्ष संपायचे नाव घेत नाही, अशी खोचक टीका रक्षा खडसेंनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी