28 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरराजकीयPrithviraj Chavan : भाजप-शिंदे सरकारचा राज्याला फायदा नाही; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Prithviraj Chavan : भाजप-शिंदे सरकारचा राज्याला फायदा नाही; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे भाजप सरकार गुजरातमध्ये नेत असताना राज्याचे नेतृत्व कुठलाही विरोध करताना दिसत नाही. या नव्याने सत्तेत आलेल्या डबल इंजिनचा राज्याला फटकाच बसत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून आर्थिक मदत केली पाहिजे. सरकारने राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करावा. मात्र, राज्य सरकारने आतापर्यंत कुठलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही, अशी टीका करत, भाजप-शिंदे सरकारचा राज्याला कुठलाही फायदा नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे भाजप सरकार गुजरातमध्ये नेत असताना राज्याचे नेतृत्व कुठलाही विरोध करताना दिसत नाही. या नव्याने सत्तेत आलेल्या डबल इंजिनचा राज्याला फटकाच बसत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे.

कॉंग्रेसची ‘भारत जोडो पदयात्रा’ 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या यात्रेच्या नियोजनाची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते बोलत होते. राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात देशात बेरोजगारी, महागाई यासारख्या अनेक संकटात नागरिक आहेत. त्यामुळे अन्याय, असहिष्णुतेच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करुन देशात लोकशाही टिकवली जाणार आहे. कॉंग्रेसची पदयात्रा असून भाजप व नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसच पुढाकार घेत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

अशी असेल महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा
भारत जोडो पदयात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर हिंगोली, वाशिम असा यात्रेचा मार्ग असणार आहे. त्यानंतर हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातून तीचा प्रवास असणार आहे. महाराष्ट्रात ही पदयात्रा 16 दिवस असणार असून कॉंग्रेससह कॉंग्रेसचे मित्र पक्ष तसेच अनेक समविचारी संघटना देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत नांदेड आणि शेगाव येथे जाहीर सभा होणार आहेत.

– शरद पवार, उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून सुरू होऊन केरळ, कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेत कॉंग्रेससह अनेक समविचारी पक्ष, संघटना, तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. नुकतेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी