30 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरराजकीयअजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक

अजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक

मराहाष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात बोलताना विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaja) धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. त्यानंतर आता अजित पवार यांच्याविरोधात भाजप आणि शिंदे गटातील नेते  आक्रमक (BJP-Shinde group aggressive) झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन आता वाद पेटला आहे. अजित पवार यांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांच्या विधानावर माध्यमांना प्रतिक्रीया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्हीचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले. शरीराचे तुकडे झाले तरी स्वधर्म, स्वराज्याची भाषा त्यांनी सोडली नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होते, पण धर्मवीरही होतेच.

 

तर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आणि धर्मरक्षकच होते. त्यांनी हिंदू धर्मासाठी ४० दिवस अनन्य हाल भोगले, पुढची हजारो वर्ष छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच राहतील. असंही ते म्हणाले.

तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, भाजपाला विरोध करण्याच्या नादात आणि त्यांच्या “जाणत्या राजाच्या” नजरेत भरण्यासाठी अजित पवार पण आता मटनकरी आणि आव्हाड सारखं हिंदू विरोधी बोलायला लागले का? वैचारिक सुंता झाल्याचा परिणाम म्हणून अजित पवार असं बोललात. छत्रपती श्रीसंभाजी महाराजांना औरंग्याने मारले ते हिंदू धर्म सोडून इस्लाम कबूल करायला नकार दिला म्हणूनच.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?होय #धर्मवीरच ! छञपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.

 

भाजपच्या आमदार श्र्वेता महाले् यांनी देखील या मुद्द्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली आहे, त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज कोण होते याचे प्रमाणपत्र वाटप करणारे तुम्ही कोण! आकाशाएवढे कर्तृत्व गाजवणार्‍या दुसर्‍या छत्रपतींनी प्राणांचे बलिदान दिले पण धर्माचा त्याग केला नाही हा शाळेतला इतिहास तरी वाचा!

हे सुद्धा वाचा

आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क

अजित पवार यांनी लाचखोर महिला अधिकाऱ्याचा मुद्दा मांडला; फडणवीसांनी चौकशीची घोषणा केली

मंत्र्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये, जमीन घोटाळे, सीमावादावरुन गाजले हिवाळी अधिवेशन

अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते. काही जण मुद्दाम त्यांना धर्मवीर म्हणतात. मी अनेकदा संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणावे म्हणून आग्रही असतो. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नव्हता असे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले होते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी