28 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरराजकीयजालन्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची विकृती; आंदोलनात मुलाचे ओढले गुप्तांग, जबरदस्ती करायला लावली लघुशंका

जालन्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची विकृती; आंदोलनात मुलाचे ओढले गुप्तांग, जबरदस्ती करायला लावली लघुशंका

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे शनिवारी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका लहान मुलाला जबरदस्तीने भुत्तो यांच्या पुतळ्यावर लघुशंका करण्यास भाग पाडले.(BJP workers to Touching child private parts) यावेळी मुलाचे गुप्तांग ओढल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलालवल भुत्तो यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. भुत्तो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने काल देशभरात निदर्शने केली. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. बदनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिलावल भुत्तो यांच्या निषेधार्थ आंदोलन आणि घोषणाबाजी केली. मात्र या आंदोलनात एका लहान मुलाला भुत्तो यांच्या पुतळ्यावर लघुषंका करण्यास भाग पाडले. यावेळी भाजपचा पदाधिकारी त्या मुलाचे गुप्तांग ओढत असल्याचा किळसवाणा प्रकार घडला. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर जोरदार टीका देखील केली जात आहे. एखाद्या आंदोलनात मुलांचा अशापद्धतीने वापर करुन घेणे योग्य नसल्याची भावना देखील नागरिक व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

“मॅट”चा मंत्र्यांच्या मनमानीला चाप; शिफारस पत्रामुळे झालेल्या बदलीला स्थगिती!

आयकर उपायुक्ताला कोर्टाचा दणका; अवमानप्रकरणी 7 दिवसांची पोलिस कोठडी!

पोलिस अधिकारी बदल्यांचा घोळ सुरूच; गृह विभागाने तीन दिवसात फिरवला आदेश!

भाजपच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांनी आंदोलने, मोर्चे जरुर काढावेत मात्र आंदोलनामध्ये लहान बालकांचा अशा पद्धतीने वापर करुन घेणे, मुलांकडून असे कृत्य करुन घेणे, त्यांच्या शरीराला अशा पद्धतीने स्पर्श करणे हे आक्षेपार्ह असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी