34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयआमदार कपिल पाटील यांचाही पराभव करणार, भाजपचा इशारा

आमदार कपिल पाटील यांचाही पराभव करणार, भाजपचा इशारा

कोकण विभाग शिक्षक मतदार संघात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि सहकारी शिक्षक संघटनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला असून पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई शिक्षक मतदारसंघात आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) याचा देखील पराभव करु असा इशारा आता भाजपने दिला आहे. भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे (Anil Bornare) यांनी मुंबई शिक्षक मतदार संघ जिंकू असे म्हटले आहे. (BJP’s warning will also defeat MLA Kapil Patil)

विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी मतदान झाले होते. आज या पाचही जागांची मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान पहिल्यांदा कोकणच्या जागेचा निकाल हाती आला असून या जागेवर भाजप आणि महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआतील शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा २० हजार मतांनी पराभव केला आहे. या विजयानंतर कोकणमधील भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांनी जोरदार जल्लोष केला.

म्हात्रे यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनिल बोरनारे म्हणाले, मुंबईतील शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. शिक्षकांच्या या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक असलेला प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठविण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, विलंबाने होणारे वेतन, मेडिकल बिले, सेवानिवृत्ती नंतर मिळणारे पेन्शन यामध्ये दप्तर दिरंगाई होत असल्याचे देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विधान परिषद पदवीधर निवडणूकीत भाजपने खाते उघडले; कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

जितेंद्र आव्हाडांना कधीही अटक होणार ; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार १००० कोटींची उधळपट्टी !

पुढच्या वर्षी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या मतदार संघातून शिक्षक भारतीचे कपिल पाटील आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या जागेवर आता भाजपने लक्ष केंद्रीत केले असून आता आमदार कपिल पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असल्याचे बोरनारे यांच्या विधानावरुन स्पष्ट होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी