31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeराजकीयबुलढाण्याला मिळाले प्रतापराव जाधवांच्या रूपाने तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्रिपद - आ. संजय गायकवाड

बुलढाण्याला मिळाले प्रतापराव जाधवांच्या रूपाने तिसर्‍यांदा केंद्रीय मंत्रिपद – आ. संजय गायकवाड

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असले तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हणणे होते. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याला केंद्रीय मंत्रीयपदाची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतापराव जाधव हे राज्यात चार वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार आहेत.1995-99 या काळात शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये ते मंत्री होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असले तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हणणे होते. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी बुलढाण्याला केंद्रीय मंत्रीयपदाची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) हे राज्यात चार वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार आहेत.1995-99 या काळात शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये ते मंत्री होते.(Buldhana gets Union ministerial berth for third time in Prataprao Jadhav: Sanjay Gaikwad )

श्रीरंग बारणे हे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार असतील. बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार आहेत. तिसऱ्या मंत्रिपदासाठी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे नाव पुढे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्याला केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवण्याची पक्षाची इच्छा असल्याचे म्हटले आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची नजर केंद्रीय मंत्रिमंडळात तीन जागांवर असली तरी पहिल्या फेरीत पक्षाला एकच मंत्रिपद मिळणार असून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) हे या पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र आज बुलढाणा येथील शिंदे गटाचे आमदार आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी बुलढाण्याला केंद्रीय मंत्रीयपदाची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची गोड बातमी जिल्हावासीयांना दिली आहे. आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad ) म्हणाले कि, खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) यांच्या रूपाने आता 1997 नंतर या जिल्ह्याला केंदीय मंत्रीपद मिळणार आहे. हि भेट नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याचा विकास होणार आहे. रेल्वे मार्ग, नदी जोड प्रकल्प, आणि एमआयडीसी चे प्रश्न मार्गी लागणार आहे. आपण जनतेनी त्यांना संधी दिली म्हणूनच प्रतापरावांना ( Prataprao Jadhav) हे मिळालं. याच सर्व श्रेय बुलढाणेकरणाचा आहे. आणि याचा लाभ हि आपण सर्वांना होईल असे त्यांनी सांगितले.आज सायंकाळी राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होईल यानंतर देशभरातील केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटातील प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav) यांच नाव शपथविधी मध्ये सर्वात पुढे राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी