31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeराजकीयमनुस्मृती जाळून दाखवा; जितेंद्र आव्हाड यांचं मुश्रीफ यांना आव्हान

मनुस्मृती जाळून दाखवा; जितेंद्र आव्हाड यांचं मुश्रीफ यांना आव्हान

मनुस्मृतीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यातील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काहींनी आव्हाडांवर टीका केली आहे. आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी आधी मनुस्मृती जाळून दाखवावी असे आव्हान आव्हाडांनी दिले आहे. मनुस्मृतीप्रकरणाने राज्यातील अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याची चर्चा होताच त्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली.शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर महाड येथे जाऊन मनुस्मृती जाळली.

मनुस्मृतीवरुन (Manusmriti) राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यातील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काहींनी आव्हाडांवर (Jitendra Awhad) टीका केली आहे. आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी (Mushrif) आधी मनुस्मृती(Manusmriti) जाळून दाखवावी असे आव्हान आव्हाडांनी (Jitendra Awhad) दिले आहे. मनुस्मृतीप्रकरणाने(Manusmriti) राज्यातील अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याची चर्चा होताच त्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली.शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तर महाड येथे जाऊन मनुस्मृती जाळली.(Burn Manusmriti; Jitendra Awhad challenges Mushrif)

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तर महाड येथे जाऊन मनुस्मृती जाळली. पण त्यावेळी वाद त्यांच्या अंगलट आला. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीला तीव्र विरोध करत आव्हाडांची पाठराखण केली. तर आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी आणि भाजप गटातील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुश्रीफांवर (Mushrif) पलटवार केला आहे. आधी हसन मुश्रीफ (Mushrif) यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी.ते पुरोगामी म्हणता तर मनुस्मृतीवर आधी बोला.हम दो हमारे 11 यावर मुश्रीफ यांनी आधी बोलून दाखवावं असे आव्हान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुश्रीफांना दिले आहे. त्यामुळे आता हा वाद अजून पेटण्याची चिन्हं आहेत.

काय म्हणाले होते मुश्रीफ
मनुस्मृतीचे दहन करायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला होता.जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचा अपमान केला आहे. केवळ माफी मागून होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली होती.

हा विचारांचा प्रश्न
हा विचारांचा प्रश्न आहे. भुजबळ यांनी स्पष्ट सांगितल की ते अनवधानाने घडलं. मनुस्मृती जाळणं हा उद्देश होता, हे त्यांनी सांगितलं. भुजबळांनी पाठराखण केल्याबद्दल आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली. भुजबळांनी मनुस्मृतीला विरोध करत याप्रकरणात आव्हाडांची पाठराखण केली होती.

मुश्रीफांना असा इशारा
पुण्यातील पोर्श कार प्रकरणात जितेंद्र आव्हाड पुण्यात येणार आहेत. रवींद्र धांगेकर यांनी सगळ्यांना घेरून टाकलं आहे. तावरे यांना कोणी आणलं हे वेगळं सांगायला नको, असा टोला त्यांनी लगावला. मी तर माफी मागितली लगेच. पण आपण कोणाला सोडत नाही, असा इशारा ही त्यांनी दिला. हा रोख मुश्रीफांकडे होता का अशी चर्चा आता रंगली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी