पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (By-elections) तारखा आज केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केल्या असून येत्या २७ फेब्रुवारी रोजी या दोन जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तर दोन मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. (By-elections of Kasba Peth and Chinchwad assembly constituencies announced)
कसबा पेठेतून दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या काही दिवसांपुर्वी दोन्ही आमदारांचे दिर्घ आजाराने निधन झाल्याने या दोन जागांवर आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेप्रमाणे दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणुका होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा
दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक
कराची विमानतळ दाऊदच्या ताब्यात
सामनामध्ये विकिपिडीयावरुन कॉपी पेस्ट करणारे संपादक; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर बोचरी टीका
कसबा पेठेतून भाजपच्या उमेद्वार मुक्ता टिळक या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेद्वार लक्ष्मण जगताप हे विधानसभेवर निवडून गेले होते. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप गेले गेले काही महिने आजारपणाशी झुंज देत होते. मात्र दोन्ही आमदारांचे उपचारादरम्यान निधन झाले. हे दोन्ही मतदार संघ भाजपच्या ताब्यात होते.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे आता दोन्ही मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेप्रमाणे दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार का? या दोन्ही मतदार संघातून भाजप कोणाला उमेदवार घोषित करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा आहे पोट निवडणुक कार्यक्रम ?
- ३१ जानेवारी पोटनिवडणुकांसाठी अधिसुचना जारी.
- ७ फेब्रुवारी – अर्ज भरण्याची अंतिम मुदत.
- ८ फेब्रुवारी – अर्जांची छाननी होणार.
- १० फेब्रुवारी – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख.
- २७ फेब्रुवारी – मतदान.
- २ मार्च – मतमोजणी.
- ४ मार्च – संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण होणार.