30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
HomeराजकीयCaptain Amarinder Singh : पक्ष बदलू अशी ओळख असलेल्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री...

Captain Amarinder Singh : पक्ष बदलू अशी ओळख असलेल्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टनअमरिंदर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

आता तर त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनाच गळाला लावले आहे. पक्ष बदलू मंत्री अशी त्यांची ख्याती असल्याने भाजपने त्यांना सहज गळाला लावले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

देशात सगळीकडे मिशन लोटस सुरू आहे. भाजपने सगळया राज्यात आपले पाय रोवण्याचा वीडा उचलला आहे. न भूतो न भविष्यती असे चक्रव्यूह आखून भाजप मोठया नेत्यांना गळाला लावत आहे. या कार्यात अनेक ठिकाणी यापूर्वी यश आल्यावर त्यांचे मनोबल आणखी भक्कम झाले आहे. आता तर त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनाच गळाला लावले आहे. पक्ष बदलू मंत्री अशी त्यांची ख्याती असल्याने भाजपने त्यांना सहज गळाला लावले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते एकटेच गेले नाहीत तर त्यांनी त्यांचा संपूर्ण‍ पक्षच भाजपमध्ये विलीन केला आहे. पंजाब लोक काँग्रेस (PLC ) हा त्यांचा पक्ष आहे.

या घटनेमुळे पंजाबच्या राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. यामध्ये पंजाबच्या भविष्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आमच्या पक्षाची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कॅप्टन अमरिंदर सिंग 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसपासून वेगळे झाले.

त्यानंतर त्यांनी 2022 च्या निवडणुकीसाठी पीएलसी पक्षाची स्थापना करुननंतर भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर आपने मारलेल्या मुसंडीमध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपला पंजाबमध्ये फूट पडल्यानंतर एक शिख चेहरा हवा होता. तो त्यांना मिळाला आहे. अमरिंदर सिंह यांच्यामुळे आता हिंदू आणि शिख असा दोन धर्मांच्या लोकांवर भाजपची पकड राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

P. L. Deshpande : पु. ल. देशपांडे कला अकादमीतील असुविधा आणि ठेकेदाराच्या मक्तेदारीबद्दल सांस्कृतिक मंत्र्यांकडे तक्रार

Queen Elizabeth : पाणावलेल्या नेत्रांनी महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण निरोप

Smriti Mandhan : वनडे सामन्यात भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, स्मृति मंधानाचे शतक थोडक्यात हुकले

जाणून घ्या : कॅप्टन अमिरिंदर सिंह यांच्या बद्दल

कॅप्टन अमिरिंदर सिंह यांचे शिक्षण डेराडून येथे झाले. त्यांनी 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात मोठे योगदान दिले. त्या ठिकाणी ते शिख रेजिमेंटचे कॅप्टन होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी हे त्यांचे शाळेतील मित्र होते. त्यांना राजकारणात राजीव गांधी यांनी आणले. त्यानंतर त्यांनी अकालीदलामध्ये प्रवेश केला. अकाली दलात निवडणूक जिंकल्यानंतर ते वनमंत्री होते.

1992 मध्ये त्यांनी अकाली दल सोडले. त्यानंतर‍ त्यांनी शिरोमणी अकाली दल नावाचा पक्ष तयार केला. तिथे पराभव झाल्यानंतर त्यांनी 1998 मध्ये काँग्रेसबरोबर हात मिळवला. त्यानंतर 2017 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहीली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी