28.7 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरराजकीयVEDIO : कोर्लईतील १९ बंगल्याचा घोटाळा ; ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल

VEDIO : कोर्लईतील १९ बंगल्याचा घोटाळा ; ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल

कोर्लई येथील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या कुटूंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मागे लागलेले चौकशांचे शुक्लकाष्ठ थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत आता सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीवर सुरुवातीला १९ बंगले होते. याबाबतची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. २०१४ साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासकट विकत घेतली. हे सर्व बंगले आपल्या नावे करण्यासाठी पाठपूरावा करण्यात आला होता. त्यानंतर हे बंगले ठाकरे आणि वायकर यांच्या नावावरही झाले होते. मात्र, हे प्रकरण अंगलट येऊ शकते हे लक्षात आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दबाव टाकून २०२२ बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली, असा आरोप डॉ. किरीट सोमैया यांनी केला होता.

 

हे सुद्धा वाचा

विषारी हवेने घेतला १३,४४४ मुंबईकरांचा बळी

पोलिसांची ‘सामना’ कार्यालयात घुसून दमदाटी

फुकटचे बुडबुडे फोडू नका, ५६ इंचाची छाती काय असते ते जावेद अख्तरांकडून शिका! ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी