32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमविआने उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुंटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी!

मविआने उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुंटुंबातील व्यक्तीला भाजपची उमेदवारी!

कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत (Kasba by-election) भाजपने ब्राह्मण उमेदवार नाकारल्याने पुण्यात नाजारी असताना टिळक कुटुंबिय देखील नाराज होते. दरम्यान टळक कुटुंबियांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) सुरु असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील टिळक कुटुंबियांशी संवाद साधल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, जर महाविकास आघाडीने (MVA) रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी मागे घेतली तर आम्ही टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यास तयार आहोत. एक वर्षासाठी निवडणूक लादू नये असे देखील ते म्हणाले. (Chandrasekhar Bawankule said, if MVA withdraws the candidate, a person from the Tilak family will be nominated by the BJP)

पिंपरी-चिंचवड मधील चिंचवड आणि पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कसब्यातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजपबद्दल ब्राह्मण समाजात नाराजी वाढली असून तसे पोस्टर देखील पुण्यात लागले आहेत. या सर्व गदारोळात आज देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल टिळक यांना दोन वेळा फोन करुन त्यांची मनधरणी केल्याचे समजते.

दरम्यान संध्याकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील केसरी वाड्यात टिळक कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी टिळक कुटुंबियांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, मुक्ता टिळक आमच्या नेत्या होत्या. टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. पण टिळक कुटुंबातील कोणी नाराज नाहीत. भाजपमध्ये कोणालाही जाणिवपूर्वक डावलेले जात नाही.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजनांच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या नावाने भव्य स्पर्धा

ब्राम्हणेतर व्यक्तीला उमेदवारी दिली, आता भोगा परिणाम ! हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा भाजपला थेट इशारा

भाच्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप, मामा देखील नाराज; काँग्रेस हायकमांडला पाठविले पत्र

आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यास तयार आहोत, पण महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवारी अर्ज उद्या तीन वाजेपर्यंत मागे घ्यावा. एक वर्षासाठी निवडणूक लादू नये. कुणाल टिळक, गणेश बिडकर, धीरज घाटे हे सगळेच ताकदवान उमेदवार आहेत. कोणीही उभे राहिले तरी १०० टक्के निवडून येईल. मात्र एका जागेवरून सर्वजण लढू शकत नाहीत. त्यामुळे टिळक परिवार किंवा कोणालाही डावलण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी