33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeराजकीयChandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न...

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न…

सीतारामण यांचे दूत म्हणून चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये पाहणी करीत आहेत. निर्मला सीतारामण यांच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळे व राज्यातील अन्य नेते सुप्रिया सुळे यांचा कसा पराभव करता येईल याची चाचपणी करीत आहेत. निर्मला सीतारामणसारख्या दिग्गज नेत्याने बारामती मतदारसंघात लक्ष घातल्याने त्याविषयी जोरात चर्चा सुरू आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सन 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचे मनसुभे भाजपने आखले आहेत. त्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्यामुळे बळकट झालेला आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना हरविणे तर कठीणच, पण डिपॉझिट सुद्धा वाचविणे अनेकांना जमलेले नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे ‘उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेत’ असल्याची टीका गोटे यांनी केली आहे. बारामती काबिज करण्याचे मनसुभे म्हणजे शिडी लावून उंटाच्या …. मुका घेण्याचा प्रयत्न करणे होय. पण मुका घेऊ द्यायचा की नाही, हे उंटाच्या मनावर अवलंबून आहे. ठिकाणाच्या जवळ पोहचावे, अन् उंटाने पुढे सरकावे. बावनकुळेंची बत्तीसी बाहेर… अशा शब्दांत गोटे यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न...

हे सुद्धा वाचा…

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

Brahmastra : रिलीजआधीच ‘ब्रह्मास्त्र’ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

Lumpy Skin : जनावरांना ‘लम्पी’ आजाराचा धोका

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नव्यानेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी उत्साहात कामाला सुरूवात केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच मुंबई दौऱ्यावर येवून गेले. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या नेत्यांना कानमंत्र दिला. त्यामुळे साहजिकच बावनकुळे हे सुद्धा जोरदार कामाला लागले आहेत. राज्यभरातील महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भरीव कामगिरी करण्यासाठी बावनकुळे यांनी आताच प्रचाराला सुरूवात केली आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप अवकाश आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, राहूल कुल असे नेते त्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची मजबूत बांधणी करण्यासाठी केंद्रातून निर्मला सीतारामण यांच्यावर खास जबाबदारी देण्यात आली आहे.

सीतारामण यांचे दूत म्हणून चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये पाहणी करीत आहेत. निर्मला सीतारामण यांच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळे व राज्यातील अन्य नेते सुप्रिया सुळे यांचा कसा पराभव करता येईल याची चाचपणी करीत आहेत. निर्मला सीतारामणसारख्या दिग्गज नेत्याने बारामती मतदारसंघात लक्ष घातल्याने त्याविषयी जोरात चर्चा सुरू आहे. परंतु बारामती मतदारसंघ काबिज करणे एवढे सोपे नाही. उंटाचा मुखा घेण्याचा हा प्रयत्न आहे, अशा शब्दांत अनिल गोटे यांनी टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी