33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयचंद्रशेखर बावनकुळे पालघरमध्ये कडाडणार!

चंद्रशेखर बावनकुळे पालघरमध्ये कडाडणार!

भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय 2024 अभियान’ अंतर्गत राज्यभरातील लोकसभा प्रवास योजनेत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाचे दौरे केले जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आत्तापर्यंत 19 लोकसभा मतदार संघात संवाद साधला असून शुक्रवारी (27 ऑक्टोबर) ते पालघर लोकसभा मतदार संघाला भेट देणार आहेत. या दौऱ्या मध्ये चंद्रशेखर बावनकुळे 1000 सुपर वॉरियर्स बरोबर संवाद साधणार आहेत. जव्हार आणि वसई येथे ते 1000 सुपर वॉरियर्स सोबत संवाद साधल्यानंतर ‘घर चलो’ अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती ते देतील.

भाजपाच्या ‘महाविजय 2024 अभियान’ अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाचे दौरे केले जात आहेत प्रत्येक दौऱ्यात ते अनेक महत्वाच्या व्यक्तींची भेट घेत आहेत. तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची भेट घेत आहेत. बावणकुले यांनी आत्ता पर्यंत 19 लोकसभा मतदार संघात संवाद साधला असून आता ते पालघर लोकसभा मतदार संघात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि वसई येथे ते 1000 सुपर वॉरीयर सोबत संवाद साधतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल ते ‘घर चलो’ अभियाना’ अंतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मतदारसंघाचा आढावा घेतील, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस अॅड.माधवी नाईक आणि जिल्हा अध्यक्ष भरत रजपूत यांनी दिली

हे ही वाचा 

मुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य समोर!

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच

या दौऱ्या च्या वेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक,सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रभारी राणी दिवेदी, लोकसभा प्रवास प्रमुख नंदकुमार पाटील, जिल्हा अध्यक्ष भरत रजपूत, संघटन मंत्री हेमंत म्हात्र , बाबाजी काठोले, सर्व विधान सभाप्रमुख डॉ हेमंत सवरा, संतोष जनाठे, विलास तरे, अमित घोडा, जिप कृषी सभापती संदीप पावडे, जिप उपाध्यक्ष पंकज कोरे, हरीचंद्र भोये, सर्व जिल्हा सरचिटणीस सुशील औसरकर, ज्योति भोये, अशोक वडे, जयवंत डोगरकर, प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित राहणार आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी