भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात तर त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता (Chhagan Bhujbal using OBC movement for his corrupt practices). त्यासाठी त्यांना दोनेक वर्ष तुरुंगातही जावे लागले होते. आम्ही स्वतः भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची ८ – १० पोती कागदपत्रे बाहेर काढली होती. त्यामुळं भुजबळ यांचं खायचं दात, व दाखवायचं दात आम्हाला चांगले ठाऊक आहेत.आता भुजबळ यांच्याकडं अन्न व नागरी पुरवठा खातं आहे. गोरगरीब लोकांना दोन वेळचं जेवण देण्याचं काम या खात्याकडून होतं. पण या खात्यातही छगन भुबजळ यांनी भ्रष्टाचार आणला आहे.
लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका
छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा: विजय वडेट्टीवार
या नव्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे सुद्धा ‘लय भारी’च्या हाती लागले आहेत. लवकरच आम्ही त्याचा पर्दापाश करणार आहोत.
थोडक्यात काय तर, छगन भुजबळ यांचा मूळ आत्मा हा भ्रष्टाचारी नेत्याचा आहे. ते जिथं जातील तिथं भ्रष्टाचार करतात. या भ्रष्टाचारामुळं काही संकट कोसळलंच तर त्यासाठी जनता आपल्या मागे असायला हवी, यासाठी त्यांनी ओबीसी चवळवळीचं नाटक केलेलं आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत ओबीसींचं काहीही भलं केलेलं नाही. स्वतःच्या तुंबड्या भरणं व ते करण्यासाठी ओबीसी चळवळीचा पद्धतशीरपणे वापर करणं हीच छगन भुजबळ यांची निती राहिलेली आहे.
त्यामुळं लक्ष्मण हाके(laxman Hake) यांनी सध्या जे मोठं आंदोलन उभं केलं आहे, त्या आंदोलनाचं श्रेय भुजबळ यांनी लाटण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळं शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलाविली. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनीच केलं. त्यानंतर वडीगोद्री येथे ते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडविण्यासाठी सुद्धा गेले. मुळात हे आंदोलन लक्ष्मण हाके या धनगर नेत्यानं उभं केलं आहे. असं मोठं आंदोलन छगन भुजबळ यांच्या समता परिषदेनं अद्याप का नाही केलं ? भुजबळ गेल्या वर्षाभरापासून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कोल्हेकुई करीत आहेत. पण भुजबळ यांची प्रतिमा मलिन आहे. ते संधीसाधू आहेत, हे ओबीसी समाजालाही चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं ओबीसी समाजाने भुजबळ यांना फार पाठिंबा दिला नाही. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाला मात्र चांगलं यश मिळालंय. या यशस्वी आंदोलनात भुजबळ यांनी लगेचच घुसखोरी करून त्याचं श्रेय स्वतःकडं खेचण्याचा प्रयत्न चालवलाय.
आता या आंदोलनाचा फायदा घेवून भुजबळ त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार सरकारमध्ये आपलं वजन वाढवतील. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करतील. सरकारमध्ये स्वतःची ताकद वाढविल्यानंतर स्वतःच्या खात्यात ते भ्रष्टाचार सुद्धा वाढवतील. हीच छगन भुजबळ यांची निती आहे.