29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराज्यसभेवर सर्व निवडून येतील त्याचप्रमाणे विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील :...

राज्यसभेवर सर्व निवडून येतील त्याचप्रमाणे विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील : छगन भुजबळ

टीम लय भारी 

मुंबई : राज्यसभेची निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घमासान सुरु आहे. भाजपने राज्यसभा निवडणूकीत जास्त उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल. कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. (Chhagan Bhujbal’s reaction on Rajya Sabha elections)

राज्यसभा असो या विधानपरिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील अशी खात्रीही छगन भुजबळ यांनी यावेळी बोलून दाखवली.

पंकजाताई मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते. दिलेल्या संधीचं सोनं करेन परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले.

कुठल्याही धर्मगुरूविरुध्द बोललं जाऊ नये. अपमानकारक बोललं जाऊ नये. प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे. हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांने केले आहे. त्याची सजा इतर भारतीयांना नको. एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात केवळ प्रसिद्धी मिळावी त्यासाठी काहीजण करत असतात. त्या नुपुर म्हणजे भारत नव्हे. त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील असेही छगन भुजबळ म्हणाले.

कृपाशंकर सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जावा असे म्हटले आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सगळ्यांनी सर्व भाषा शिकाव्यात विशेष करुन मुंबईत उत्तरभारतीय लोक मुंबईत मोठ्याप्रमाणावर आहेत त्यांना मराठी शिकायला कृपाशंकर सिंग यांनी सांगावे असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

 


हे सुद्धा वाचा : 

 

नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास ईडीने करावा : छगन भुजबळ

नवनीत राणा मागासवर्गीय आहेत का, छगन भुजबळांचा बोचरा सवाल

भाजपने स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करावी उगाच रडीचा डाव खेळू नये – छगन भुजबळ

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी