29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeराजकीयछत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाली असा कोणताच पुरावा नाही,सुप्रिया...

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाली असा कोणताच पुरावा नाही,सुप्रिया सुळे

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. यावरुन आता राजकीय नेत्यांचे पडसाद उमटायला सुरू झालेले आहेत. आणि यावरून एक नवीन वाद रंगण्याची शक्यता दिसत आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj and Ramdas met There is no such proof, Supriya Sule) 

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना एका सभेत हे वक्तव्य केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी सभेत,  “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे,” असे वक्तव्य केले आहे.

त्यानंतर हे लक्षात त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाला निकालाचा दाखला दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या अकाऊंट वर यावर ट्विट करत  न्यायालयाच्या निकालाची प्रत ट्विटमध्ये जोडली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीत नवे आर. आर. पाटील उदयाला येत आहेत

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….

NCP MP Supriya Sule objects to Maharashtra governor referring to Samarth Ramdas as Chhatrapati Shivaji Maharaj’s guru

सुप्रिया सुळे यांनी ट्विटर मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं आहे. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी, त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली,” असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

त्यासोबतच , आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले,” असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी