26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकीयमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

टीम लय भारी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची आज १२ खासदारांसह पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी १२ खासदारांनी त्यांना पाठिंबा देत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्रातील आताचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे देखील सांगितले. याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवण्यात आली आहे. असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराकडून देण्यात आली. त्यावेळी संजय राऊत यांचा सकाळचा मॅटिनी शो बंद झाला आहे. राऊतांच्या या आरोपावर बोलण्याची गरज वाटत नाही. इतर कोणी हे बोलले असते तर दखल घेतली असती, हे इतके महत्वाचे नाही. असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊतांच्या या आरोपांना उडवून लावल्याने आणि त्यांचा मॅटिनी शो बंद असल्याचे म्हटल्याने आता संजय राऊत यांवर नेमके काय उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे. कारण संजय राऊत हे सुद्धा त्यांना बोलणाऱ्यांना उत्तर देताना मागे पुढे पाहत नसल्याचेच हल्ली दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा :

शिंदे गटाची ताकद वाढली

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!