28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयVedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री...

Vedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

ठाण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ठाण्याचा बिहार झालाय असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. परदेशी नावाच्या गुंडाने दिवसाढवळ्या एकाचा भरगर्दीत गळा चिरला, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जीवन पाटील याच्या घरावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर चौदा टाके पडले. त्याच्या आईलाही मारहाण झाली. ठाण्यात कायद्याचा वचक राहिला नाही. गुंडांनाही आता बंदुकींचा परवाना मिळायला लागला आहे. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. पण त्यात त्यांचा दोष नाही, ते बिचारे हुकुमाचे ताबेदार आहेत. परंतु या सर्वामध्ये ठाण्याचं वाटोळं होत आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

पोलीस व्यवस्थेचेही धिंडवडे निघाले असल्याची खोचक टीका जितेन्द्र आव्हाड यांनी केली आहे. येऊरच्या जंगलात सर्व अवैध धंदे खुलेआम सुरु असून २४ तास दारू मिळते, २४ तास वेश्याव्यवसाय चालतो. येऊरचं नैसर्गिक सौंदर्य धुळीस मिळाले आहे. उलटपक्षी मुख्यमंत्रांच्या ठाण्याची सुधारणा झाली पाहिजे होती, पण हप्ता संस्कृतीमुळे ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी बिघडत चालली आहे. असे खून जर व्हायला लागले तर ठाणे यापुढे ‘क्राईम कॅपिटल’ म्हणून ओळखले जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस विभागातील भ्रष्टाचारावर भाष्य केले. सेवाज्येष्ठतेनुसार कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या डोक्यावर बसवण्यात येत आहे. पोलीस खात्यातील वशिलेबाजीवर आव्हाड यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, या सर्व वशिलेबाजीमुळे पोलीस वैफल्यग्रस्त झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

VEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी