31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरराजकीयHemant Soren : झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची...

Hemant Soren : झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे पद जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. या बाबत लवकरच राज्यपाल निर्णय घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून सेरेना यांनी आमदारांच्या बैठका घेतल्या. शनिवारी 27 ऑगस्टला सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या आमदारांसह काँग्रेस आणि इतर‍ म‍ित्र पक्षांच्या आमदारांना बँगा घेऊन बोलावले होते. या सर्व आमदारांना छत्तीसगढमध्ये हलव‍िण्यात येणार असल्याचे माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे खाण वाटपामध्ये दोषी आढळले आहेत. तसा अहवाल निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे सोपवला आहे.

सोरेन हे आमदार म्हणून राहण्यास योग्य नाही. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोणत्याही क्षणी सही करतील म्हणून सोरेन यांचे टेन्शन वाढले आहे. सोरेन 3 लग्जरी बसमध्ये आमदारांना घेऊन निघाले आहेत.
या तीन बसना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. बस पाठोपाठ हेमंत सोरेन यांचे समर्थक देखील आहेत. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाची सुरक्षा देखील वाढविण्यात आली आहे. आजच्या बैठकीपूर्वी सर्व आमदार बँगा घेऊनच आले होते. हेमंत सोरेन यांचे छोटे भाऊ आमदार वसंत सोरेन देखील मीटिंगमध्ये पोहोचले होते.

हे सुद्धा वाचा

Devendra Fadnavis : संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र फडणवीस

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेत नाहीत; गुलाम नबी आझाद यांचा खुलासा

झारखंडचे राज्यपाल रमेश व्यास यांनी हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द केली आहे. 21 जुलै 2021 मध्ये देखील झारखंड सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये 3 लोकांनापूर्वी अटक केली होती. तर 30 जुलै 2022 रोजी 45 लाख रुपयांसह काँग्रेसच्या तीन आमदारांना हावडा येथे अटक करण्यात आले होते. भाजपने मुख्यमंत्री सोरेन यांच्या विरुद्ध केस दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

मात्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करून भाजपला उत्त द‍िले आहे. ‘आम्ही सरकारी खुर्चीचे भुकेले नाही. एका संवैधानिक व्यवस्थेमुळे आज आम्हाला असे राहावे लागते आहे’. सोरेननंतर कोणाची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. संख्याबळानुसार जेएमएम हा झारखंडमधला मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला सत्तेतून पाय उतार करण्याचे हे भाजपचे षडयंत्र असल्याचे हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी