32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात 'पक्षप्रमुख' म्हणणे टाळले

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, संदेशात ‘पक्षप्रमुख’ म्हणणे टाळले

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज (दि. 27 जुलै) वाढदिवस. आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून, शिवसैनिकांकडून, अगदी सामान्य लोकांकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा न चुकता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शुभेच्छा संदेशात केवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उल्लेख करीत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर यावेळी ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणणे टाळले आहे. त्यामुळे त्यांच्या या शुभेच्छा संदेशावर उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी वाढदिवसाचे कोणतेच पोस्टर सुद्धा त्यांनी पोस्ट केलेले नाही. मुख्यमंत्री शिंदे ट्विटमध्ये लिहितात, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….” असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

राजकारणातील बंडखोरीमुळे शिवसेना आणि शिंदेसेना असे दोन गट पडले. शिंदेगटाचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत असल्याने शिवसेना नेमकी कोणाची असा प्रश्न जनतेत वाद वाढवू लागला आहे. शिंदे गटातून सुद्धा शिवसेना, शिवसेनाप्रमुख पदावर दावा सांगण्यात येऊ लागला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना केलेला अभिष्टचिंतनाचा संदेश फारच बोलका आहे.

हे सुद्धा वाचा…

‘उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील’, ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

VIDEO : आणि भीती खरी ठरली!

११ वीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी