26 C
Mumbai
Monday, March 27, 2023
घरराजकीयसामनामध्ये विकिपिडीयावरुन कॉपी पेस्ट करणारे संपादक; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर बोचरी...

सामनामध्ये विकिपिडीयावरुन कॉपी पेस्ट करणारे संपादक; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi Mumbai visit उद्या (दि.१९) रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिकीया देताना प्रधानमंत्री ज्या कामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येत आहेत त्याची पायाभरणी शिवसेनेने केली आहे, एका अर्थाने पंतप्रधानांनी आमच्या कामावर शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले होते. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अतिशय बोचरी टीका करत संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. (Chitra Wagh criticism of Sanjay Raut reacting to the PM Modi Mumbai visit)

चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर ट्विटरवरुन टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”अरे तोंड दिलं म्हणून काही तरी बरळायचं अशी काही लोकांना सवय असते,त्यातला हा एक प्रकार! सामनामध्ये विकिपीडियावरून लेख कॉपी करून टाकणाऱ्या संपादकांनी स्वकर्तुत्वाच्या बाता मारणे म्हणजे एक जोकचच! तुमच्या स्थगिती सरकारनं कधी प्रगती केलीच नाही! तर फुकटच क्रेडिट घ्यायचं बंद करा!!!

मुंबईतील मेट्रो -७ आणि मेट्रो २ ‘ए’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, प्रधानमंत्री ज्या कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत, त्यांची पायाभरणी शिवसेनेने केली आहे. एका अर्थाने प्रधानमंत्र्यांनी आमच्या कामावर शिक्कामोर्तब केले. संजय राऊत यांच्या याच विधानावर चित्रा वाघ यांनी टीका आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून मोदी यांची बिकेसी मैदानावर भव्य सभा देखील होणार आहे. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने लोकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेऊन मैदान, पार्किंगच्या जागेसाठी तयारी सुरू आहे. या सभेतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गटाने आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडणार अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढदावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूकमालाड: बीएमसीने आखली रस्ता रहदारी कमी करण्याची योजना

मालाड: बीएमसीने आखली रस्ता रहदारी कमी करण्याची योजना

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमावर संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या तिरकस शैलीतून टीका करताना या कामांची सुरुवात शिवसेनेनेच केली होती. त्यावर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्याचे विधान त्यांनी केल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर अत्यंत बोचरी टीका करत त्यांना लक्ष्य केले. तुमच्या स्थगिती सरकारने कधी प्रगती केलीच नाही त्यामुळे तुम्ही क्रेडीट घ्याटचे बंद करा असे देखील म्हटले आहे. खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनाच्या अग्रलेखातून ते पक्षाची भूमिका मांडत असतात. तसेच रविवारच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक सदरातून देखील ते अनेक मुंद्यांवर भाष्य करत असतात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी