28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयचित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका नव्या सरकार समोर गायब

चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका नव्या सरकार समोर गायब

टीम लय भारी

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका चार वर्षीय मुलीवर गावातील तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगावर नेहमीप्रमाणे निषेध व्यक्त करीत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार यात ठोस भूमिका घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान एखादा गुन्हा, अन्याय झाल्यानंतर तत्परतेने पुढे येणाऱ्या चित्रा वाघ यांच्या या बदलेल्या मवाळ भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

लहानग्या मुलीवर झालेल्या बलात्कारावर व्यक्त होत चित्रा वाघ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. चित्रा वाघ ट्विटमध्ये लिहितात, “उस्मानाबाद जिल्हा 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडलीये.. यासंदर्भात उस्मानाबाद SP शीं बोलणं झालेलं आहे तसेच विधी व न्याय विभागाकडूनही तात्काळ आर्थिक मदत ही परीवाराला दिली जाणार असून चिमुरडीच्या उपचाराचा खर्चही उचलला जाणार आहे”, अशी माहिती वाघ यांनी दिली आहे.

पुढे वाघ लिहितात, “या झाल्या उपाययोजना पण हे नक्कीचं पुरेसं नाही..अशा घटना घडूचं नये यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील पोलिसयंत्रणेने करणे गरजेचे या हरामखोरांना कडक शासन व्हावे जेणेकरुन कुणी हिंमत करणार नाही नक्कीचं सरकार यात ठोस भुमिका घेईल हा विश्वास,” असे म्हणून त्यांनी नव्या सरकारबाबत पुर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.

कोणताही गुन्हा घडला की चित्रा वाघ त्यांचा आवेश, बोलण्याची पद्धत, टीका, धडपड, पाठपुरावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरणे यासाठीच त्या ओळखल्या जातात, परंतु नवे सरकार आल्यापासून वाघ यांनी काहीसे नमते घेत सरकारवर विश्वास दर्शवत मवाळ भूमिका स्विकारली आहे त्यामुळे त्यांची ही आक्रमक भूमिका कुठे गायब झाली अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा…

जनरल नाॅलेज: राष्ट्रपतींना ‘शपथ‘ कोण देतो?

संतापजनक! परीक्षेवेळी विद्यार्थीनींना काढायला लावले अंतर्वस्त्र, पाच महिला अटकेत

शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी