30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरराजकीयमातंग समाजासाठी सरकार सकारात्मक: मुख्यमंत्री शिंदे

मातंग समाजासाठी सरकार सकारात्मक: मुख्यमंत्री शिंदे

मातंग समाजबांधवांवर वारंवार कोठे ना कोठे अन्याय आणि अत्याचाराचे प्रकार घडत आहेत. परंतु, अशा घटनांची सरकार व प्रशासकीय यंत्रणा गंभीर दखल घेत नसल्याच्या अनेक तक्रारी त्यांनी मांडल्या. या धर्तीवर विधानमंडळात शनिवार दि. 25 मार्च रोजी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची (Matang community) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राजाभाई सूर्यवंशी यांनी मातंग समाजातील शहीद स्व. संजयभाऊ ताकतोडे आणि स्व. प्रदीपराज गायकवाड यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत घेण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) शिष्टमंडळासोबत जवळपास 1 तास चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री चर्चेत सर्वच मुद्यावर सकारात्मक होते. परंतु मंत्रालयीन सचिव हे मातंग समाजाच्या मागण्याबाबत जाणीवपूर्वक नकारात्मक होते आणि ते मुख्यमंत्री यांना चुकीची माहिती पुरवत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मातंग समाजाच्या प्रश्नांनवर त्यांना तात्काळ लाभ होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यात लक्ष घालावे अशा सूचना त्यांनी सचिवांना दिल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एक महिन्यांनी आरक्षण वर्गीकरणाबाबत बैठक लावण्याचे सचिवांनी सांगितले. त्यामुळे ही बैठक सुरुवात आहे शेवट नाही. तसेच प्रश्न जरी निकाली लागले नसले तर योग्य पद्धतीने हाताळण्यास सुरुवात झाली हे मात्र निश्चित. त्यामुळे नाउमेद न होता पुन्हा ताकतीने कामाला लागू हाच निश्चय सर्वांनी करावा, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

वरील सदस्यांव्यतिरिक्त बाबुरावजी मुखेडकर, रवींद्र दळवी, डॉ. बळीरामजी गायकवाड सर, रमेशजी साळवे, श्री सोनोने, सौं सरोजिनी सकटे, श्री पी एस मोतेवाड तर प्रशासनाच्या वतीने बार्टीचे महासंचालक मा. सुनिलजी वारे, मा.आयुक्त श्री नारनवरे, मा. सचिव सुमंत भांगे तसेच इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :

मातंग व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत न्यायला विरोध, ग्रामपंचायतीसमोरच केले दहन

एकनाथ शिंदेची बाजू सावरुन घ्यायला शंभूराज देसाई आले; अजित पवारांनी दाखवला रुद्रावतार

राज्याने केंद्र सरकारकडे मागितले 1600 कोटी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी