29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयछंद डिग्र्यांचा: डॉक्टरेटनंतर 77 टक्क्यांनी उत्तीर्ण होत मुख्यमंत्र्यांनी मिळवली 'ही' पदवी

छंद डिग्र्यांचा: डॉक्टरेटनंतर 77 टक्क्यांनी उत्तीर्ण होत मुख्यमंत्र्यांनी मिळवली ‘ही’ पदवी

राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. सतत राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा सामना करावा लागणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी पूर्ण केली आहे. या परीक्षेमध्ये त्यांना 77% गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत. नुकत्याच मिळालेल्या डॉक्टरेट पदवीनंतर त्यांनी आता पत्रकारितेच्या पदविकेचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डिग्र्यांचा छंद लागलाय का, असा सवाल विरोधकांना पडला आहे.

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिंदे यांनी वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविकेचे प्रमाणपत्र घेतले आहे. या परीक्षेमध्ये ते 77 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी शिंदेंना हे प्रमाणपत्र दिले. ससर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्य बातमीदारी करण्याचा सल्ला दिला. मी आजही पाहत होतो, काही जण उगाचच बोलत होते, असे ते म्हणाले.

दरम्यान शिंदे यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. विशेष प्राविण्यासह 77.25 टक्के गुण देखील मिळविले आहेत. त्यांनी हा अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या यशाने विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले.

यापुर्वी डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मंगळवार, 28 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देत सन्मानित करण्यात आले आहे. शिंदे यांना डॉक्टरेट मिळाल्याने त्यांचं सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आलं. मात्र आता पत्रकारितेची पदवी बहाल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डिग्र्यांचा छंद लागलाय का, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय.

हे सुद्धा वाचा :

अजित पवारांच्या गोपनीय दौऱ्याची चर्चा; सत्तासंघर्षाच्या निकालावर नो कॉमेंट्स

निर्लज्जासारखं हसताय…जनता धडा शिकवेल; सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

शिंदे सरकारवर अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार; निर्णय अध्यक्ष महोदयांकडे!

CM eknath shinde, CM eknath shinde obtained journalism degree with 77 percent

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी