30 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरराजकीयCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अयोध्या दौऱ्यावर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अयोध्या दौऱ्यावर

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटातील आमदार देखील हजेरी लावणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांसोबत अयोध्येत जाऊन ‘जय श्री राम’चा नारा देत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या दौऱ्याची माहिती दिली. अयोध्या दौरा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा महत्वाचा विषय बनला आहे. जो कोणता राजकीय नेता अयोध्या दौरा करतो त्याचा फार गाजावाजा करण्याची पद्धत सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.

याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याचा मुद्दा खूप गाजला होता. परंतु मध्येच राज ठाकरे यांची हिप बोन्सची शस्त्रक्रिया झाल्याने राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होऊ शकला नाही. तसेच त्यावेळी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी देखील विरोध केला होता. त्यामुळे राज ठकरे यांनी घाबरून हा दौरा रद्द केल्याचे बोलले गेले. पण तेव्हा अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.

पण या हायव्होल्टेज नाट्यानंतर जोपर्यंत भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे राज ठाकरे यांची माफी मागत नाही तोपर्यंत अयोध्येत जाणार नाही असा निर्णय राज ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला. पण काही दिवसांआधीच अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले.

हे सुद्धा वाचा

CM Eknath Shinde : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी!; शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा करणार!

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांसोबत अयोध्येत जाऊन शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. पण हे कितपत खरे आहे हे अद्याप तरी कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नोव्हेंबरमध्ये जाण्याची तारीख निश्चित नसली तरी ते त्यांच्या आमदारांना घेऊन अयोध्येचा दौरा करणार असल्याचे तरी निश्चित झाले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात अनेक चढउतार पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांची सत्ता संपुष्ठात येऊन एकनाथ शिंदे यांची सत्ता आली त्यामुळे अयोध्येचा मुद्दा मागे पडला होता. पण आता पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा अनेक महिन्यानंतर समोर आला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!