30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeराजकीयCongress agitation : एकनाथ शिंदे सरकारची हुकुमशाही, काँग्रसचे आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट...

Congress agitation : एकनाथ शिंदे सरकारची हुकुमशाही, काँग्रसचे आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस या द्विसदस्यीय मंत्रीमंडळाने आपला खरा चेहरा दाखविण्यास सुरूवात केली आहे. लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु पोलीस बळाचा वापर करून शिंदे सरकारने काँग्रेसचे आंदोलन (Congress agitation) चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस या द्विसदस्यीय मंत्रीमंडळाने आपला खरा चेहरा दाखविण्यास सुरूवात केली आहे. लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु पोलीस बळाचा वापर करून शिंदे सरकारने काँग्रेसचे आंदोलन (Congress agitation) चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी या विरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज आंदोलनासाठी एकत्र आले होते. पण काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी बंदिस्थ करण्याचा प्रयत्न केला. सगळे काँग्रेस नेते विधीमंडळ परिसरात जमा झाले होते. पण त्यांना आंदोलन करताच येणार नाही, अशा पद्धतीने शिंदे सरकारने पोलिसांकरवी दमण केल्याचे दिसून आले.
नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड असे प्रमुख काँग्रेसचे नेते विधीमंडळ परिसरात आले होते. हे आंदोलन होवू नये म्हणून पोलिसांनी त्या अगोदर काँग्रेस नेत्यांना नोटीसा सुद्धा बजावल्या.

बाळासाहेब थोरातांचा रूद्रावतार
पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेस नेते प्रचंड संपातले होते. बाळासाहेब थोरात यांनी तर रूद्रावतार धारण केला.

थोरात म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. मग लोकांना मदत कशी देणार. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नुसते दिल्लीत चकरा मारत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही आंदोलन करीत आहोत. पण आम्हाला आंदोलन करू दिले जात नाही. विधीमंडळ आवारात पोलीस आम्हाला अडवू शकत नाहीत. आम्हाला रोखलं जातंय. पण आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. जनता मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. जनता आमच्यासोबत आहे. आंदोलन रोखून गळचेपी केली जात आहे. जनतेचे प्रश्न तुम्ही मांडू देत नाहीत. संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचे सांगत थोरात यांनी संताप व्यक्त केला.

Aaditya Thackeray : यशवंत जाधवांच्या मतदार संघातही आदित्य ठाकरेंना दणक्यात प्रतिसाद !

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरता, तुमच्यात एकवाक्यता नाही का ? अजित पवारांचा सवाल

Eknath Shinde Cabinet Expansion: दीपक केसरकरांचे तर्कट, जेव्हा दिल्लीवाऱ्या वाढतात, तेव्हा मंत्रीपदाच्या याद्या अंतिम झाल्याचे समजायचे

दुधावर, पीठावर, भाकरीवर मोदी सरकारने टॅक्स लावला आहे. आम्ही त्या विरोधात आवाज उठविणारच. तो आमचा अधिकार आहे. आम्ही हा अधिकार हिरावणार नाही. हे अन्याय करणारे सरकार आहे. त्यामुळे आंदोलन चालू राहणार. महाराष्ट्रात व देशात आंदोलन चालणार, असे थोरात म्हणाले.

लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण
भाजपकडून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रिटीशांनीही अशा पद्धतीने आंदोलन दाबले नव्हते, असे अशोक चव्हाण म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी