30 C
Mumbai
Sunday, March 24, 2024
Homeराजकीयपुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची...

पुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची मागणी

टीम लय भारी:

मुंबई: बंडखोरांच्या मागणीला टक्कर देण्यासाठी काॅंग्रेसने नवा मुद्दा उचलून धरला आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतमध्ये ‘पुणे शहराला जिजाऊ नगर नाव द्या‘ तसेच न्हावा शेवा मार्गाला बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव द्या अशी मागणी केली. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्याचे घोषणा केली आहे. या विमानतळाच्या नावा वरुन खूप वादंग निर्माण झाला होता.

आजची मंत्रीमंडळाची बैठक विविध कारणांनी गाजली. यामध्ये नामांतराच्या विषयावर विशेष चर्चा झाली. भाजप आणि बंडखोर पक्षाचे आमदार सातत्याने औरंगाबादच्या नामांतराची मागणी करत आहेत. औरंगाबादचे संभाजी नगर करा ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवसेनेच्या निवडणूक अजेंडयावर देखील हा विषय होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. अशी तक्रार बंडखोर नेत्यांनी गेल्या आठ दिवसांत अनेक वेळा केली आहे.

हे सुध्दा वाचा:

वसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी