29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीय'त्या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं, भाजपला टॅग केलं तरी हरकत नाही'

‘त्या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं, भाजपला टॅग केलं तरी हरकत नाही’

टीम लय भारी

मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर केंद्र सरकारनं वर्षभरापूर्वी आणलेले कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजपवर टीकेची झोड उठली असून शेतकऱ्यांच्या लढ्याचं कौतुक होत आहे(Congress general secretary Sachin Sawant tweeted to BJP)

शेतकऱ्यांना सौहार्दाचे व शांततापूर्ण चर्चेचे सल्ले देणाऱ्या सेलिब्रिटींवरही टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या संदर्भात एक ट्वीट करत सेलिब्रिटींना शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्याचं आवाहन केलं आहे.

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

Congress : मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार

साधारण वर्षभरापूर्वी कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलन पेटले. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी यात आघाडीवर होते. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडं कूच केले. दिल्लीत प्रवेश नाकारला गेल्यानं शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडलं.

केंद्र सरकारनं केलेले चर्चेचे प्रयत्नही निष्फळ ठरले. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तरीही आंदोलक मागे हटत नव्हते. याच काळात शेतकरी आंदोलनाच्या बाजूनं आणि शेतकरी आंदोलनाच्या विरोधात देशात दोन गट पडले होते. देशातील नामवंत क्रिकेटपटू, अभिनेत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता.

Congress : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप, शेट्टी, चव्हाण यांची नावे चर्चेत

CM Naveen Patnaik Distributes Smart Health Cards In Angul; Congress Stages Black Flag Protest

काही सेलिब्रिटींनी सरकारच्या चर्चेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. तर, काहींनी बाह्य शक्ती आमच्यात फूट पाडू शकत नाहीत, असं म्हणत आंदोलनाला बाहेरून पाठिंबा मिळत असल्याचं अप्रत्यक्षपणे सुचवलं होतं. यातील अनेक सेलिब्रिटींचे एकाच प्रकारचे होते. त्यातील प्रत्येक शब्द एकसारखा होता.

त्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका झाली होती. आता मोदी सरकारला माघार घ्यावी लागल्यानंतर हेच सेलिब्रिटी आणि भाजप टीकेच्या रडारवर आला आहे.

सचिन सावंत यांनी विराट कोहली, सुरेश रैना, सायना नेहवाल, अक्षय कुमार, अनिल कुंबळे व लता मंगेशकर यांचे ट्वीट सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यातील ‘सौहार्दपूर्ण तोडगा’ या शब्दाकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे.

‘सेलिब्रिटींनी हव्या असलेला सौहार्दपूर्ण तोडगा आता निघाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी न्यायासाठी लढलेल्या लढ्याचं कौतुक करणारे ट्वीट ते करतील अशी अपेक्षा आहे.

हे ट्वीट करताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना वा कार्यकर्त्यांना टॅग केले तरी हरकत नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ‘भाजपवाल्यांनी पूर्वीप्रमाणे सेलिब्रिटींना ट्वीट लिहून द्यावेत,’ असा खोचक टोलाही सावंत यांनी हाणला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी