32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयकाँग्रेस नेत्या अलका लांबाने केला स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप

काँग्रेस नेत्या अलका लांबाने केला स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप

टीम लय भारी

गोवा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी जोईश इराणी हिने एका मृत व्यक्तीच्या नावे मद्य परवान्याचे नूतनीकरण केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडीओ अलका लांबा यांनी ट्विटरवर शेअर केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोईश इराणी हिचे गोव्यातील आसगाव येथे सिली सोल्स कॅफे अँड बार नावाचे अलिशान असे हॉटेल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोईश इराणी हिने मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावे मद्य परवान्याचे नूतनीकरण केले. पण धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्तीचा मृत्य हा १७ मे २०२१ झाला आहे. आणि या मद्याच्या परवान्याचे १३ महिन्यानंतर म्हणजेच २२ जून २०२२ ला नूतनीकरण करण्यात आले. यासाठी जोईश इराणी हिला गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून नोटीस देखील पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, ही माहिती गोव्यातील काही वृत्तपत्रांनी दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्याकडून स्मृती इराणी यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्मृती इराणी यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत गोव्यामध्ये असलेल्या भाजप सरकारवर आणि यंत्रणांवर दबावतंत्र वापरून मुलीला अवैधपणे मद्य परवाना काढून देण्यास मदत केली का? असा प्रश्न अलका लांबा यांच्याकडून स्मृती इराणी यांना विचारण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची नोंद घेता, गोव्याचे उत्पादन शुल्क आयुक्त (Excise Commissioner) नारायण एम. गाड (Narayan M. Gad) यांनी २१ जुलै रोजी रेस्टॉरंटला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. परवाना मिळविण्यासाठी मालकांनी “फसवी आणि बनावट कागदपत्रे” सादर केली होती, अशी तक्रार वकील आयर्स रॉड्रिग्स यांनी केली आहे. तरी, या प्रकरणी २९ जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा :

VIDEO : अल्पवयीन विद्यार्थिनीचे धर्मांतर करून केला बलात्कार; श्रीरामपुरात धक्कादायक घटनेने माजली खळबळ

VIDEO : कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेलं एक फळ

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी