31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयकाँग्रेसचे नेते अमित देशमुख जेव्हा देवेंद्र फडणवीसांचे समाधान करतात ...

काँग्रेसचे नेते अमित देशमुख जेव्हा देवेंद्र फडणवीसांचे समाधान करतात …

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील कलाकार, कलावंतांच्या प्रश्‍नावरील लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली, व याबाबतचा निर्णय मांडला.(Congress leader Amit Deshmukh satisfies Devendra Fadnavis)

एवढेच नव्हे तर मानधनाचे अर्ज मंजुर करण्याबाबतच्या अटी शिथिल करून ही प्रक्रीया सुलभ करण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे या विषयावरील चर्चेत अगदी विरोधी पक्षनेचे देवेद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

सुनिल प्रभु यांच्या या लक्षवेधीला त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागातील कलाकार, लोककलावंत व विविध कला, संस्कृतीचे जतन करणाऱ्या कलाकारांना कोरोना काळात मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधान वितरणाची प्रक्रीया तसेच त्यात वाढ करण्याबाबत आज विधानसभेत लक्षवेधी चर्चेला आली होती.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गावखेड्यांपर्यंत जाऊन महागाईबाबत जनजागृती करणार : नाना पटोले

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, अजित पवार

पुणे शहरात लागले “गो बॅक मोदी” चे होर्डिंग

An uneasy BJP-Sena alliance gives advantage to Congress in Marathwada’s Latur district

 यावेळी ते म्हणाले, या कालाकारांसाठी मानधन देण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. तो अतिशय सकारात्मक आहे. त्यात ३८ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. ढोबळपणे चाळीस कोटी खर्च येऊ शकेल. मात्र गरज पडली तर त्यात वाढ करण्याचा देखील विचार शासन करेल.

त्यानंतर विविध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना देखील त्यांनी असे पॉझिटीव्ह उत्तर दिले. वैभव नाईक, वामन साळवी, नाना पटोले, आशिष शेलार यांनी यावेळी उपप्रश्‍न विचारले. त्यात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मंत्री महोदयांनी एवढे नीट आणि सुटसुटीत उत्तर दिले आहे, की त्यात काही राहिले नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणणेअमित देशमुखांचे कौतुकच केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी