33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeराजकीयCongress : काॅंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, 64 नेत्यांनी दिला राजीनामा

Congress : काॅंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, 64 नेत्यांनी दिला राजीनामा

काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा सूत्रांकडून समोर आल्याने काॅंग्रेसमधील फळी आता मजबूत होणार अशा चर्चा सुरू असतानाच काॅंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह 64 नेत्यांनी पक्षातून राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. या नेत्यांमध्ये माजी मंत्री माजीद वाणी, डॉ मनोहर लाल शर्मा, चौधरी घारू राम, माजी आमदार ठाकूर बलवान सिंह आणि  माजी सरचिटणीस विनोद मिश्रा अशा बड्या नेत्यांचा यात समावेश आहे.या राजीनामा नाट्यावर बोलताना सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे असे गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काॅंग्रेसला रामराम करीत राजीनामा दिल्यानंतर आणखी 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून एकत्रितपणे सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देणार आहेत. यावर बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील, असे म्हणून त्यांनी काॅंग्रेसला इशाराच दिला आहे.

हे सुद्धा वाचा…

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचा संजय राठोडांना धक्का !

Aam Aadmi Party : महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी उठवू शकते

Lakshman Hake News : ‘शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत, लवकर हकालपट्टी करा’

गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्याने काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी पक्षाची संपूर्ण सल्लागार यंत्रणा ‘उध्वस्त’ केल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद राष्ट्रीय पातळीवरचा एक पक्ष लवकरच स्थापन करणार आहेत. काॅंग्रेसमधील 64 नेते सुद्धा काॅंग्रेस सोडून गुलाम नबी आझाद यांच्या पक्षात सामील होणार आहेत. दरम्यान माजी मंत्री आणि आमदारांसह अनेक प्रमुख काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थेचे (पीआरआय) शेकडो सदस्य, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांचे सुद्धा गुलाम नबी आझाद यांच्या गटात सामील होणार आहेत.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी लवकरच कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेमुळे काॅंग्रेस पक्ष आणि बळकटीकरण्याच्या दिशेने कूच करणार असल्याचे म्हटले जात होते परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच दिसू लागले आहे, त्यामुळे काॅंग्रेसची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे का यावरच पक्षातील नेत्यांना विचारमंथन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी