30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयकर्नाटकात कॉंग्रेसच; एक्झिट पोल्सचा अंदाज

कर्नाटकात कॉंग्रेसच; एक्झिट पोल्सचा अंदाज

एक्झिट पोल्समध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहील, असा अंदाज आहे. मात्र, काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपला जनता दलाला साथीला घेऊनच नवे सरकार बनवावे लागेल. सरकार बनविण्यासाठी 224 पैकी 123 संख्याबळ असणे आवश्यक आहे.

कर्नाटकात कॉंग्रेसच सत्तेत येणार असा एक्झिट पोल्सचा अंदाज आला आहे. आठ एक्झिट पोल्सपैकी सहामध्ये कॉंग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. पोल ऑफ पोल्स म्हणजे सर्व आठही एक्झिट पोल्सच्या सरासरीनुसार, कर्नाटकात कॉँग्रेसला 103 ते 111 जागा मिळू शकतील. सत्ताधारी भाजपला 87 ते 97 जागांवर समाधान मानावे लागेल. जनता दलाल 21 ते 25 तर अपक्ष व इतरांना फक्त 1 ते 4 जागी यश मिळू शकते.

कर्नाटकातील एकूण आठपैकी दोन तर पाच प्रमुख एक्झिट पोलपैकी एकाने भाजप सरकार बनण्याचा अंदाज वर्तविला आहे. इतर चार प्रमुख पोल्समध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहील, असा अंदाज आहे. मात्र, काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपला जनता दलाला साथीला घेऊनच नवे सरकार बनवावे लागेल. सरकार बनविण्यासाठी 224 पैकी 123 संख्याबळ असणे आवश्यक आहे.

 

हे सुद्धा वाचा : 

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

महाराष्ट्र सत्तासंघर्ष पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे येईल, की सुप्रीम कोर्टच शिंदे सेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवेल?

राहुल गांधी म्हणाले, RSS-BJPवाले माझे गुरु; भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल मानले भाजप, संघाचे आभार !

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांवर मतदान संपल्यानंतर घेतल्या गेलेल्या कर्नाटक एक्झिट पोल 2023 नुसार, 13 मे रोजी कर्नाटकचे चित्र काय असेल, ते आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बहुतेक 2018 प्रमाणेच त्रिशंकू अवस्था राहू शकेल. कर्नाटकात भारतीय जनता पक्ष (भाजप) पिछाडीवर असल्याचे या पोळामध्ये दिसत असून काँग्रेस विजयी होताना दिसत आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) म्हणजेच जेडीएस हा पक्ष किंग मेकरची भूमिका बजावू शकते.

Congress Winning Karnataka, Bye Bye BJP, Karnataka Exit Poll, Assembly Election 2023, Rahul Gandhi Beating Narendra Modi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी