32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरराजकीयMaharashtra Politics : 'सामना'मधून सत्ताधारी आणि 'ईडी'वर जाेरदार टीका

Maharashtra Politics : ‘सामना’मधून सत्ताधारी आणि ‘ईडी’वर जाेरदार टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजप, शिंदे आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. संजय राऊत हे सामनाचे मुख्य कार्यकारी संपादक आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले की, मी कोणावरही टीका करणार नाही आणि आपल्या विरोधात षडयंत्र रचले गेले आहे आसेतू मला वाटतं नाही. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीबाबतही चर्चा केली. आश्चर्याची बा म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचेही कौतुक केले. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसेनेचा दृष्टिकोन बदलला की काय ? अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र आता पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजप, शिंदे आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. संजय राऊत हे सामनाचे मुख्य कार्यकारी संपादक आहेत.

‘सामना’मधून केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशात कायद्याचे राज्य नाही, असे सामना या वृत्तपत्रात लिहिण्यात आले आहे. न्यायव्यवस्था दबावाखाली आहे आणि केंद्रीय संस्था गुलाम बनल्या आहेत. संजय राऊत प्रकरणातून ही बाब समोर आली आहे. सामनामध्ये सरकारी एजन्सींवर टीका करताना भाजप नेत्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र भाजपचे किमान 7 मंत्री, 15 आमदार आणि खासदार आणि पक्षाला अर्थपुरवठा करणाऱ्या बिल्डरांवर अनेक गुन्हे असल्याचे देखील सामनामधून खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध तपास झाल्यास ते तुरुंगात जाऊ शकतात, मात्र ‘ईडी’ आरोपींची निवड करते, असे न्यायालयानेच म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील तरूणांचे रोजगार मोदींनी हिरावून घेतले; राहूल गांधींचा हल्लाबोल

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

एकनाथ शिंदे यांनीही सामनामधून खिल्ली उडवली
शिवसेनेला आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’चा वापर करण्यात आला. यापूर्वी ईडी ज्यांना अटक करणार होती, त्यांना शिवसेना सोडताच क्लीन चिट देण्यात आली. शिंदे-फडणवीस पुढे न झुकणारे ‘ईडी-सीबीआय’चे गुन्हेगार ठरले. देशात कायद्याचे राज्य नाही. न्यायव्यवस्था दबावाखाली असून केंद्रीय व्यवस्था गुलाम बनली आहे. संजय राऊत यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही राजकीय षड्यंत्राखाली तुरुंगात गेले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ‘ईडी’ प्रकरणे याचे साक्षीदार आहेत, असेही सामनामध्ये लिहिण्यात आले आहे.

अनिल देशमुख बनले ‘बळीचा बकरा’
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे सहकारी एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहेत. हे सर्व राजकीय षडयंत्राखाली केले जात आहे. मुंबई-ठाण्यातील बारमालकांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांना देऊ शकतात का ? परंतु मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके पेरण्याच्या कटातील आरोपी असलेल्या अधिकाऱ्याच्या साक्षीच्या आधारे ईडी आणि सीबीआयने स्वतः देशमुख यांच्याविरुद्ध खटल्याचा निर्णय घेतला. ज्याने या खटल्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या मित्राची हत्याही केली, अशी माहिती सामनामधून देण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!