28 C
Mumbai
Friday, January 24, 2025
Homeराजकीयसमृ्द्धी महामार्गावर होणार 'या' सोयीसुविधा

समृ्द्धी महामार्गावर होणार ‘या’ सोयीसुविधा

राज्यात समृध्दी महामार्गाची अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. लांबचा पल्ला गाठण्यासाठी महामार्गालगत कोणत्याच सोयीसुविधा नाहीत. यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांस अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या चौपदरीकरणावर अनेक अपघात झाले आहेत. यामुळे या महामार्गावर वाहनांची गर्दी विरळ दिसते. याच महामार्गालगत प्रवाशांसाठी उपहारगृह, स्वच्छ्तागृह आणि वाहनांसाठी पेट्रोलपंपची सुविधा करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी दिली आहे.

विधानपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघातावर लक्ष घातलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिकेत तटकरे आणि इतर सदस्यांनी महामार्गावरील अपघाताबाबत इतर उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. उपाययोजना करण्यापूर्वी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना अडचणी आल्या आहेत. यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. ही समस्या लक्षात घेत दादा भुसे यांनी येत्या दीड महिन्यात पेट्रोलपंप, उपहारगृह आणि स्वच्छ्तागृह उभारण्यात येतील,असे आश्वासन दिलं आहे.

हे ही वाचा

अॅनिमल चित्रपटाच्या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा; खासदारांची मुलगी ढसाढसा रडू लागली

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

आश्रमशाळेत २८२ शिक्षक पदभरती

समृध्दी महामार्गावर अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी अपघात होत आहेत. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणं धोक्याचं आहे. अनेक कुटुंब, नातेवाईक या महामार्गावर उध्वस्त झाली आहेत. यासाठी महामार्गाच्या ठिकठिकाणी मेटल क्रॅश बॅरियर्स बसवण्यात येत आहेत. याचे काम आता ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच होईल. त्याचप्रमाणे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुंबलिंग स्ट्रिक प्रकारचे गतिरोधक महामार्गावर लावण्यात आले आहेत. अशा काही उपाययोजना समृध्दी महामार्गावर करण्यात आल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी