29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयदीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

दीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यालय उभारलं आहे. या पाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दालनात आपलं कार्यालय उभारण्यासाठी, ताबा मिळवण्यासाठी काल ता.4 ऑक्टोम्बर या दिवशी केसरकरांनी आपली निश्चिती दिली. हे सर्व येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा आढावा घेऊन पाऊलं उचलली जात आहेत. महानगरपालिकांचे हक्क विसर्जित होऊन आता 18 महिन्याचा काळ लोटला आहे. तरीही अजून महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल बोललं जात नाही. महानगरपालिकेचे कार्यालय बंद असल्याने आता सामान्य नागरिकांची कामे कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आता सक्रिय होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ठाकरे गटातून 35 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून केसरकर यांच्या दालनामुळे माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकऱ्यांना पालिकेत एकत्र येण्यास बळ मिळाले आहे. येत्या महापालिकेच्या निवडणुकांचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, मुंबई मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगितुरा पहायला मिळू शकतो. यामुळे आता पालिकेत लोकांचे मत किंवा लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी दीपक केसरकर आपल्या पक्षासाठी पाऊल उचलत आहेत.

हेही वाचा 

राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

अजित पवार भाजपसोबत का गेले? शरद पवारांनी केला गौप्यस्फोट

अजितदादांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणविसांचा वाजविला ‘बँड’ !

त्याचप्रमाणे काल दीपक केसरकर यांचे कार्यालय सुरू करण्यासाठी योग्य जागा मिळाली नाही. यामुळे हे कार्यालय उभारण केसरकर यांना अवघड गेलं आहे. एवढंच नाही तर पहिल्या मजल्यावरील निवडलेलं कार्यालय हे आकाराने लहान असल्याने आलेल्या सामान्य जणांचे त्यांनी स्थायी समिति सभागृहात थांबून प्रश्नाचे आणि समस्यांचे निराकरण केले आहे. याबाबत नागरिकांनी देखील यावेळी येऊन गर्दी करून आपले प्रश्न दीपक केसरकरांपुढे मांडले होते.

सामान्य नागरिकांचे प्रश्न

मुंबई उपनगरतून अनेक नागरिकांनी केसरकर यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि आपल्या समस्या मांडल्या आहेत. आपल्या विभागातील जलतरण तलावाचे शुल्क वाढवल्याबाबत तक्रार केली. तर वडाळा स्थानकाच्या स्कायवॉकवर अतिक्रमण, शिवडी किल्याच्या बाजूला अनधिकृत बांधकाम अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव, वडाळा येथील माजी नगरसेवक अमेय घोले, विभागप्रमुख दिलीप नाईक आदि उपस्थित होते.

केसरकर हे आता आठवड्यातून दर बुधवारी जनतेच्या समस्येसाठी उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे आता शिंदे गटातील काही नेते देखील आगामी महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण पाहता आपले स्वत:चे कार्यालय मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करतील. तसेच केसरकरांना दिलेले दालन पाहता. कॉँग्रेस महिला नेत्या वर्षा गायकवाड यांनी निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी