30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरराजकीयDeepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता राज्यातील शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाद हे पाहायला मिळत आहेत. यालाच उद्देशून आता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी त्यांच्या फेसबुकला एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता राज्यातील शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाद हे पाहायला मिळत आहेत. यालाच उद्देशून आता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी त्यांच्या फेसबुकला एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमंत देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचा संत म्हणून उल्लेख केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे हृदयसम्राट संबोधले आहे. ज्यामुळे हेमंत देसाई यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये दीपक केसरकर यांच्यासारखा संतपुरुष भेटल्याबद्दल ठाणे हृदयसम्राट माननीय एकनाथजींनी परमसंतोष व्यक्त केल्याचे ऐकले. दीपकजी हे संत असल्याचे अगोदरच कळले असते, तर त्यांच्या चरणांवर डोके ठेवण्यासाठी आमच्यासारखे अनेकजण आधीच धावले असते… असे म्हणत दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे.

दीपक केसरकर यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हेमंत देसाई यांनी या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्यांच्या या पोस्टमध्ये केला आहे. ‘हे केसरकर महाराज अगोदर राष्ट्रवादीत होते. तेथून ते शिवसेनेत आले आणि नंतर एकनाथजींबरोबर गुहाटीला कीर्तन रंगवत होते. आजही त्यांचे कीर्तन सुरू झाले की, अनेकांची समाधी लागते..’ असे म्हणत हेमंत देसाई यांनी शाब्दिक फटकेबाजी केली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची मज्जा घेतली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांचे पितळ पाडले उघडे!

दीपक केसरकरांना अरविंद सावंतांकडून प्रत्यूत्तर

पण सध्या एकनाथ शिंदे यांची ज्या पक्षाशी जवळीक निर्माण झाली आहे, त्यांच्यातील बहुतांशी लोकांसोबत शिंदेंच्या गटातील आमदारांचे जुने वैर आहे. ते वैर आजही कायम आहेत. याचा उल्लेख सुद्धा हेमंत देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपचे नेते नारायण राणे यांना महाराज म्हणत, या संतपुरुषाची ज्या पक्षाशी जवळीक निर्माण झाली आहे, त्या भाजपमध्ये एक नारायण महाराज आहेत. आणि हा कोकणातील नारायण नामे आणखी एक संतपुरुष ज्या पक्षात जातो, तो पक्ष संपतो, असे निरूपण केसरकर महाराजांनी पूर्वी केले होते. आपल्याला मनोहर पर्रीकर मोदींकडे घेऊन गेले होते, भाजपची ऑफर होती, असेही त्यांनी सांगितले होते. असा टोला लगावला आहे.

एकूण, इंदुरीकर महाराजांपेक्षा केसरकर महाराज हे जास्त डिमांडमध्ये आहेत! अशा या संतपुरुषाचे माहात्म्य एकनाथजींनी सांगितल्यामुळे, त्यांचे दर्शन घेण्यासाठी यापुढे रांगा लागण्याची शक्यता आहे, असे पोस्ट करत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे दीपक केसरकर खरचं स्वतःला संत समजू लागले आहेत ? आणि म्हणूनच त्या पद्धतीने ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किंवा त्यांच्या गटाचे मत वयात करताना बोलतात का ? असे वाटू लागले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!