27 C
Mumbai
Thursday, March 16, 2023
घरराजकीयमाजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही सोडली ठाकरेंची साथ; शिंदेच्या उपस्थितीत केला शिवसेनेत...

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही सोडली ठाकरेंची साथ; शिंदेच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. मला गेली तीन वर्षे घरी का बसविले, याचे कारण अजूनही समजले नाही. मला मंत्रीपद नको, काम हवे आहे, असे डॉ. सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आता दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. डॉ. दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठं काम केलं आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सेवा दिली. कमी बोलणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून जास्त काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याचप्रमाणे ॲड.हर्षल चोरडिया आणि एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी देखील शिवसेना (शिंदे गट) प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला आहे.

जानेवारी २०१९ मध्ये डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला होता. दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये त्यावेळी नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.

हे सुद्धा वाचा : 

शिवसेना शाखेवरुन ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी