24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी'; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

‘राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी’; चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोवर फडणवीसांचे वक्तव्य

राज्यात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या फोटोवरून एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी बावनकुळेंचा कॅसिनो खेळतानाचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. राऊतांनी बावनकुळेंचं नाव न घेता हिंदुवादी आणि जुगारी असे वक्तव्य केले होते. यावर भाजप आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने बावनकुळे हे कधीही जुगार खेळले नसल्याचे वक्तव्य केले आहे. ते कुटुंबासोबत गेल्याचे भाजपने सांगितले. तसेच बावनकुळेंनी देखील याबाबत खुलासा करत कुटुंबासोबतचे फोटो शेअर केल्याने भाजप आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना फटकारले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले की, ‘संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती डिसपरेट झालेत हे लक्षात येऊ लागले आहे. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये थांबले होते. बावनकुळे यांनी जिथे जेवण केलं तिथे रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केलाय. पूर्ण फोटो ट्विट केला त्यात स्पष्टपणे लक्षात येतंय, बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी, नातू, त्यांचा परिवार आहे, सर्वजण त्यामध्ये दिसत आहेत. ही विकृत मानसिकता संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्टेशन योग्य नाही’, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

तुम्ही फॉर्म केलेले फोटो, कापलेले फोटो असे फोटो अपलोड करून तुम्ही वाईट आणि खालाच्या पातळीचे राजकारण करता. राजकारणाची पातळी खाली जाण्यासारखी आहे. यावर स्पष्टीकरण देत बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबासह फोटो शेअर करत खरी खोटी सुनावली आहे.

काय म्हणाले बावनकुळे

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत. दरम्यान, या एका फोटोवरून चाललेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवारांनी आपले मत व्यक्त करत कुठे कोण जुगार खेळतयं काय करतंय याबाबत महाराष्ट्राला देणं घेणं नाही.

काय म्हणाले रोहित पवार?

कोण कुठे जाऊन जुगार खेळतंय, कोण कुठे जाऊन काय करतय याच्याशी महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, त्यामुळे उगाच बिनकामाच्या गप्पा न मारता मुद्याचं बोला हीच आज राज्याची मागणी आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी