32 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयदेवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार ? निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्याचा लवकरच निकाल

देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार ? निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्याचा लवकरच निकाल

विधानसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या समरी क्रिमिनल केस २७०३६/२०१९ मध्ये अॅड. सतीश उके यांची उलटतपासणी नुकतीच पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते याची उत्कंठा राज्यात निर्माण झाली आहे. (Devendra Fadnavis against election affidavit case  will be decided soon)

लोकप्रतिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे यासंबंधी खटला दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही. त्यांचे वकील अॅड. सुबोध धर्माधिकारी यांनी अॅड. सतीश उके यांची उलटतपासणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पूर्ण केली. एड उके हे सध्या प्रवर्तन निदेशालय (ईडी )च्या ताब्यात असल्याने ही उलटतपासणी वारंवार लांबणीवर पडत होती. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.

हे सुद्धा वाचा

अन् मुख्यमंत्री शिंदे थेट मनसे कार्यालयात; राजकीय चर्चेला उधान!

तब्बल 30 वर्षानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो  

देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके 2014 पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी